jitendra avhad replies udayanraje | Sarkarnama

शरद पवार हे जाणते राजे : आव्हाडांचे उदयनराजेंना उत्तर

उमेश घोंगडे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

पुणे : कुणी काहीही म्हणत असले तरी राज्याच्या राजकीय, सामाजिक, अर्थिक अशा सर्वांगीण विकासाची माहिती असलेल, प्रश्‍नांची जाण असलेले शरद पवार हेच एकमेव नेते आहेत. त्यामुळे तेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे "जाणता राजा' आहेत, असे मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या जयभगवान भोयल यांच्या पुस्तकावरून सध्या वाद सुरू आहे. या संदर्भात माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पवार यांना जाणता राजा या उपाधीवर टीका केली. त्याला आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

आव्हाड म्हणाले, "शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था, औद्योगिक प्रश्‍न, स्त्रिायांचे प्रश्‍नांसह संपूर्ण महाराष्ट्राला ओलखणारे एकमेव नेते शरद पवार हेच आहेत. या अर्थाने ते महाराष्ट्राचे जाणता राजा आहेत, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

गेल्या साठ वर्षांत राज्याच्या राजकारणात पवार सक्रिय आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासात पवारांचा मोठा वाटा आहे. अनेकजण त्यांचे बोट धरून राजकारणात आले आहेत. बातम्यांची हेडलाइन व्हावी, प्रसिद्धी मिळावी यासाठी त्यांच्यावर अनेकजण रोज टीका करीत असतात. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत. मात्र, प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर पवार यांच्याकडे आहे. तेवढी जाण आणि क्षमता त्यांच्याकडे आहे म्हणून ते जाणता राजा आहेत, ''असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख