व्हाईट हाऊसच्या सरंजामदारांना पक्षाने काय कमी दिले ? आव्हाडांचा नाईकांना टोला

जेव्हा पक्षाला खरी गरज आहे, तेव्हा हे बाहेर पडले. काय कमी केले यांना पक्षाने. गणेश नाईक यांनी पक्षवाढीसाठी काहीही योगदान दिले नाही :जितेंद्र आव्हाड
Avhaad-Naik
Avhaad-Naik

ठाणे  :  " जेव्हा पक्षाला खरी गरज आहे, तेव्हा हे बाहेर पडले. काय कमी केले यांना पक्षाने?  गणेश नाईक यांनी पक्षवाढीसाठी काहीही योगदान दिले नाही.  पवार साहेबामुळे नाईक कुटुंबातील गणेश नाईक,ज्ञानेश्वर नाईक,संजीव नाईक, सागर नाईक, तुकाराम नाईक अनेकांना सत्तापदे मिळाली. सर्व काही नाईक कुटुंबीयांकडेच होते," अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा गणेश नाईक यांच्यावर हल्ला चढवला आहे . 

 जितेंद्र आव्हाड म्हणाले,"गणेश नाईक पक्षाची वाट लावणार हे मी वारंवार सांगत होतो.पण,पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला नाही.अखेर,गणेश नाईक यांनी पद्धतशीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस संपवली.अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा येथील आमदार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.राष्ट्रवादी सोडून भाजपच्या वाटेवर असलेले गणेश नाईक यांना 2014 सालीच पक्ष सोडायचा होता.मात्र,पुढील पाच वर्षात नाईक यांनी पूर्ण पक्ष साफ केला." 

 "2014 मध्येच गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार होते. गणेश नाईक गुप्त बैठका घेत होते. त्यांच्या या हालचालींविषयी मी पक्षाला वारंवार सुचित केले. मात्र पक्षाने माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या बोलण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. साहेबानी,मला घरी बोलावून सांगितले की ,गणेश नाईक बंधुतुल्य सहकारी आहेत. ते गद्दारी करणार नाहीत. असा विश्वासही साहेबानी नाईक यांच्याबद्दल व्यक्त केला होता. त्याच्यानंतर काय गुप्त घडामोडी झाल्या आज मला सांगायच्या नाहीत," असेही आव्हाड म्हणाले.

 " जेव्हा पक्षाला खरी गरज आहे, तेव्हा हे बाहेर पडले. काय कमी केले यांना पक्षाने. गणेश नाईक यांनी पक्षवाढीसाठी काहीही योगदान दिले नाही . कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मिरा-भाईदरमध्ये पक्षाची चांगली ताकद असतानाही राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही. अथवा राष्ट्रवादी वाढली नाही. इथले इंचार्ज गणेश नाईकच होते. तेव्हापासून जी फाटाफूट सुरु आहे ती नाईक यांच्याच इशाऱ्याने सुरु असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. कुठलाही पक्ष घरात बसून वाढत नाही, नवी मुंबईच्या व्हॉईट हाऊसवर ! पण आता सरंजामशाही गेली",असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. 

"गणेश नाईक यांनी नवी मुंबईत विकास केला हे मान्य मात्र सर्व सत्ता नाईक कुटुंबाकडे केंद्रित केली. पवार साहेबामुळे नाईक कुटुंबातील गणेश नाईक, ज्ञानेश्वर नाईक, संजीव नाईक, सागर नाईक, तुकाराम नाईक अनेकांना सत्तापदे मिळाली. सर्व काही नाईक कुटुंबीयांकडेच होते,असेही आव्हाड यांनी सांगितले. आज भाजपाच्या नेत्या मंदा म्हात्रे आम्ही गणेश नाईक यांचे नेतृत्व स्वीकारणार नाही, असे उघडपणे सांगत आहेत.  मग आता गणेश नाईक यांचा स्वाभिमान कुठे गेला?", असा सवाल श्री.  आव्हाड यांनी केला आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com