jitendra avhad attack bjp govn | Sarkarnama

 वैभवच्या घरातील स्फोटके मराठा मोर्चात घातपात घडविण्यासाठी होती : जितेंद्र आव्हाड

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मुंबई : "एटीएस' ने वैभव राऊत याच्या घरात जी स्फोटके हस्तगत केली आहे ती स्फोटके मराठा समाजाच्या आंदोलनात घातपात घडवण्यासाठी होती असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज केला. तसे ट्विटही त्यांनी केले आहे. 

या ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्रात अराजक माजेल यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. वैभव राऊतच्या घरी सापडलेली स्फोटके मराठा आंदोलनात घातपात घडवण्यासाठी होती असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. 

नक्षलवाद्यांचा वकील म्हणून गडलिंगना अटक करण्यात येते तर मग सनातनचे वकील संजीव पुनाळेकर हे तर बॉम्बस्फोटातल्या आरोपींचे खुलेआम समर्थन करत आहेत त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक का होत नाही असा सवालही त्यांनी केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख