सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी वळसे पाटलांऐवजी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती

फक्त सोलापूरच्या पालकमंत्रीपदीच बदल करण्यात आला आहे.
avhad
avhad

पुणे : सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी दिलीव वळसे पाटील यांच्याऐवजी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वळसे पाटील हे कोरोना संकटाच्या वेळी सोलापूरात न आल्याने पालकमंत्री बदलण्याची मागणी तेथील काही नेत्यांनी केली होती.

वळसे पाटील यांनी आपण सोलापूरच्या स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगत होते. तसेच सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्याचा दावा त्यांनी केला होता. सरकारनेच घराबाहेर पडू नये, असे सांगितल्याने जनतेनेही त्याचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले होते. तरी सरकारने तातडीने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वळसे पाटील यांनीच या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली असावी, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. 


शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते  75 टक्केच वेतन
कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. 

‘कोरोना’चं संकट आणि ‘टाळाबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली  घट लक्षात घेऊन तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com