जितेंद्र आव्हाड यांचे आता जयंत पाटलांच्या पावलावर पाऊल!

आव्हाड यांनी मुंब्रा-कळवा येथे कोरोनाचेआव्हान रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले असून स्वतः रस्त्यावर उतरले आहेत.
jayant-patil-jitendra-awad-
jayant-patil-jitendra-awad-

पुणे : राज्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असताना राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राबवलेला इस्लामपूर पॅटर्न  मार्गदर्शक ठरत आहे, असे सांगत गृहनिर्माण मंत्री आजच जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचे ठरविले आहे.

पाटील यांच्याकडून मी नेहमीच शिकत आलो आहे. आजच्या या कठीण काळात त्यांनी जो "इस्लामपुर पॅटर्न" या कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी इस्लामपुरात वापरला,तोच पॅटर्न मी आता माझ्या कळवा मुंब्रा भागामध्ये राबवतो आहे. हा पॅटर्न अतिशय परिणामकारक आहे. मला आशा आहे की याचे चांगले परिणाम मला माझ्या कळवा मुंब्रा मध्ये लवकरच पाहायला मिळतील, असा विश्वास व्यक्त करत इस्लामपूर पॅटर्नच कळवा-मुंब्राला करोनापासून वाचवेल, असा दावा आव्हाड यांनी केला.

काही दिवसांपूर्वी इस्लामपूर मध्ये अचानक २२ रुग्ण सापडल्यामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली होती .पण जयंत पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन इस्लामपूरमध्ये ज्या कुटुंबातील लोकांना कोरोनाची बाधा झाली होती, अशा लोकांना तत्काळ विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले. तसेच या लोकांच्या संपर्कात आलेल्या दुय्यम व तृतीय साखळीतील लोकांची ओळख पटवून त्यांचेही विलगीकरण तातडीने करण्यात आले. त्याचबरोबर संभाव्य समूह संसर्गाचे ठिकाण ओळखून तेथील व्यक्तींना त्या ठिकाणी स्थानबध्द करून आशा वर्कर मार्फत त्यांची दररोज आरोग्य तपासणी करून त्यांचे निरीक्षण करण्यात येत होते व 
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इस्लामपूर शहरातील व लोकांच्या हालचालींवर नियंत्रण आणले. लॉकडाऊन तसेच सोशल डिस्टन्स कटाक्षाने पाळण्याच्या सुचना केल्या. अश्या प्रकारे इस्लामपूर पॅटर्न राबवल्याने २६ पैकी २२ रुग्ण निगेटिव्ह आले.

या पार्श्वभूमीवर जर राजकीय व्यक्तीने एखादया विषयात लक्ष घातले व त्याला प्रशासनाने साथ दिली तर काहीही अशक्‍य राहत नाही. त्यामुळे कळवा- मुंब्रात `इस्लामपूर पॅटर्न` राबवून करोना आटोक्यात आणू, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला. सांगलीत यश आलेले पाहून जयंत पाटीलही खूष झाले होते. त्यांनी मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचा सुस्करा सोडला होता. मुंब्रा व कळवा हा दाट लोकवस्तीचा भाग असल्याने येथेही आव्हाड यांनी कसून प्रयत्न चालविले आहेत. 

वाचा हे पण....

राज्यात नवीन 210 रुग्ण

मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून शुक्रवारी राज्यात 210 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या एक हजार 574 वर जाऊन पोचली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. शिवाय राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये 13 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, आतापर्यंत राज्यात 188 बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मुंबई येथील दहा, तर पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आज झालेल्या 13 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत, तर 5 रुग्ण हे वय 40 ते 60 वर्षे या वयोगटातील आहेत. तर दोघेजण 40 वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या 11 रुग्णांमध्ये (85 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यींची संख्या आता 110 झाली आहे. 

आजपर्यंत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 33093 नमुन्यांपैकी 30477 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत; तर 1574 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत 188 कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 38927 व्यक्ती घरगुती विलगीकरण असून 4738 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com