jitendra aawhad criticize udyanraje | Sarkarnama

जनतेने पराभव केला तरीही उदयनराजेंना प्रजातंत्र समजेना: आव्हाड

संतोष शेंडकर 
गुरुवार, 16 जानेवारी 2020

जगात लोकशाही आहे, कायद्याने सर्वजण समान आहेत. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेव्दारे सर्वांना एका कक्षेत आणले आहे, हे समजून घेण्याच्या मूडमध्ये ते अजूनही नाहीत.

सोमेश्वरनगर (बारामती) : उदयनराजे यांच्या डोक्यात अजूनही संरंजामशाहीच आहे, अशी टीका राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

करंजेपूल (ता. बारामती) येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितिन यादव यांच्या निवासस्थानी आव्हाड यांनी भेट दिली. सोमेश्वर कारखान्यावर ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या 'आशा' प्रकल्पाची माहिती व पुस्तके संचालक विशाल गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांनी त्यांना भेट दिली. मराठा क्रांती मोर्चाने आव्हाड व खासदार संजय राऊत यांना 'ठोकून काढू' अशी धमकी दिली होती याबाबत आव्हाडांनी 'सकाळ'शी संवाद साधला.  

'ते' महाराज आहेत. आम्ही अजूनही सामान्य प्रजा आहोत, असा उपरोध करून आव्हाड म्हणाले, भाजप गोयल प्रकरणाशी संबंध नाही म्हणते तर जावडेकरांनी पुस्तक मागे घेण्याची घोषणा का केली? यावरून आरएसएसच्या कुशीत तयार झालेली फळी आणि भाजपाच्या मनातली महारांजांबद्दलची असूया लक्षात येते, यावर उत्तर द्यावे असे आव्हान दिले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख