jitendra aavhad on sanjay raut | Sarkarnama

ते दोघे टिव्हीकडे आणि मी त्यांच्याकडे बघत होतो!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

जितेंद्र आव्हाड हे पवार- राऊत चर्चेवेळी उपस्थित होते

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर घेतलेली पत्रकार परिषद शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यासोबत पाहिली.

फडणवीस हे राजीनामा देण्यासाठी राजभवनासाठी निघालेले असताना संजय राऊत हे शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी येत होते. तिथे पोचल्यानंतर राऊत यांची पवार यांच्याशी चर्चा सुरू झाली असताना तिकडे सह्याद्री गेस्ट हाऊसवर फडणवीसांची पत्रकार परिषद सुरू झाली. मग राऊतांनी पवारांसोबतच ही पत्रकार परिषद पाहिली. मुख्यमंत्र्यांचे मराठी भाषेतील निवेदन संपल्यानंतर राऊत हे पवार यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले, मात्र यावर उद्धव ठाकरेच बोलतील, असे सांगून ते गेले. 

त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड पवारांच्या निवासस्थानातून बाहेर आले. ते पवार- राऊत चर्चेवेळी उपस्थित होते. त्यांना या भेटीसंबंधी विचारल्यावर आव्हाड म्हणाले, पवार आणि राऊत हे दोघे टिव्हीवर पत्रकार परिषद बघत होते आणि मी त्यांच्याकडे बघत होतो.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख