पृथ्वीराज चव्हाणांच्या 'नो कॉमेंटस्‌' मागे दडलय काय

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सगळा कारभार आमदार आनंदराव पाटील यांच्या पुढाकाराने सांभाळला गेला. श्री. चव्हाण 1991 मध्ये पहिल्यांदा खासदारीकीच्या निवडणुकीस उभा होते. त्यावेळी आनंदराव पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. आमदार आनंदराव पाटील यांनाशॅडो पृथ्वीराज चव्हाण म्हणून ओळखले गेले.
prithviraj chavan
prithviraj chavan

कऱ्हाड :  काँग्रेस पक्षाच्या जुन्या फळीतील नेते आणि पक्षाच्या विविध पदांवर काम करणारे आमदार आनंदराव पाटील यांच्या बद्दल कोणीही कधीही व कसाही प्रश्न
विचारला तरी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे 'नो कॉमेंटस्‌'  असेच  उत्तर ठरलेले असते. आनंदराव नानांचा मोठा गट फुटून बाजूला जातोय, याची जराही काळजी श्री. चव्हाण यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या गटासह विरोधकांच्या गटात आमदार चव्हाण यांच्या 'नो कॉमेंटस्‌' ' प्रतिक्रिये मागे नेमके दडलय काय, असा प्रश्न विचारला जातो आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार आनंदराव पाटील यांच्या सगळ्याच हालचालीकडे पूर्ण दुल्रक्ष केले आहे. श्री. चव्हाण यांनी नजर अंदाज करण्यामागे नक्कीच त्यांची काहीतरी राजकीय व्यूव्ह रचना आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र अद्यापही कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही. 

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सगळा कारभार आमदार आनंदराव पाटील यांच्या पुढाकाराने सांभाळला गेला. श्री. चव्हाण 1991 मध्ये पहिल्यांदा खासदारीकीच्या निवडणुकीस उभे होते. त्यावेळी आनंदराव पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. आमदार आनंदराव पाटील यांना शॅडो पृथ्वीराज चव्हाण म्हणून ओळखले गेले. प्रेमलाताई चव्हाण यांच्या काळातही आनंदराव पाटील यांनी काम केले. तसेच त्यांनी पक्षात अनेक पदांवर काम केले. त्यालाश्री. चव्हाण यांचा नेहमीच ग्रीन
सिग्नल राहिला.

आमदारकीही त्याच प्रमाणपत्रावर बहाल करण्यात आली. त्यामुळे पाटील व चव्हाण यांची आघाडी कधी फुटणार नाही, विभाजीत होणार नाही, असा राजकीय अंदाज होता. मात्र 2019 मध्ये आक्रीत घडलं आणि आनंदराव पाटील यांचा गट पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून दुरावला. त्याची राज्यभर चर्चा झाली. विधानसभेच्या तोंडावर आनंदराव पाटील यांचे प्रताप व मानसिंग या दोन्ही पूत्रांसह पुतणे सुनील पाटील यांनी  भाजपमध्ये उडी घेतली. त्याला आमदार पाटील यांचा ग्रीन सिग्नल होता. त्यापूर्वी आमिदार पाटील यांनी मेळावा घेवून जाहीर बंड केले होते. त्यानंतरही त्यांनी भाजपशी सलगी वाढवली. त्यामुळे चव्हाण व पाटील यांच्यात दरी निर्माण झाली. 

विधानसभेच्या मोक्यातही आमदार पाटील यांनी गट सोडला होता. तरिही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटात मात्र शांतात होती. कोणीही त्यांच्या भुमिकेबद्दल
काहीही मत व्यक्त करत नव्हते. आमदार पाटील यांच्या कोणत्याही हालचालीवर
कोणीही काहीही मत व्यक्त करू नये, अशा सुचना आमदार चव्हाण यांनी दिल्या होत्या. विधानसभेच्या तोंडावर आमदार पाटील यांनी बंड केले होते. त्यावेळी केवळ नो कॉमेंटस्‌ असे मोजकेच उत्तर देवून आमदार चव्हाण यांनी वेळ मारून नेली.

विधानसभेच्या निकालानंतरच्या आजअखेर  आमदार पाटील यांच्याबद्दल कार्यकर्त्यांसह कोणाहीही कसाही प्रश्न विचारला तरी'नो कॉमेंटस्‌'  एवढेच उत्तर आमदार चव्हाण देत आहेत. त्यामुळे त्यांच्या 'नो कॉमेंटस्‌'  मागे नक्की दडलय तरी काय, अशी चर्चा आता त्यांच्या गटासह अन्य राजकीय पक्षातही सुरू आहे.

नो कॉमेंटस्‌ अन् स्मित हास्यही 

आमदार पाटील यांनी बंडे केले आहे. त्याबाबत प्रश्न विचारला'नो कॉमेंटस्‌'  असे उत्तर आमदार चव्हाण देत आहेत. केवळ तेवढेच बोलून विषय सोडताहेत. मात्र त्याचवेळी त्या वाक्यासोबत आणदार चव्हाण स्मित हास्यही बरेच काही सांगून जाते. त्यामुले आमदार पाटील गटाला वगळून पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचा भक्कम प्रवास सुरू राहणार आहे, हाच आत्मविश्वासही त्या हास्यामागे आहे, असे  दिसत  आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com