रत्नागिरीत समुद्रावरील विसर्जनासाठी दोघांनाच परवानही; दीड दिवसांचे आज गणेश विसर्जन

गणेशोत्सवावर कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी पालिकांनी नियोजन केले आहे. दीड व पाच दिवसांच्या घरगुती गणपतींच्या विर्सजनासाठी आठ कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे.समुद्रावर विसर्जन न करणाऱ्या नागरिकांच्या गणेशमुर्तीचे घरोघरी जाऊन संकलन केले जाणार आहे. गणेशमूर्ती घरोघरी संकलित करून त्यांचे निश्‍चितस्थळी विसर्जन करण्याचे पालिकेने ठरविले आहे
Konkan Ganesh Immerssion
Konkan Ganesh Immerssion

रत्नागिरी : जिल्ह्यात काल शांततेत मात्र मोठ्या भक्तीभावाने गणेशाची प्रतिष्ठापना झाली. आज दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन होणार आहे. यामध्ये ७ सार्वजनिक आणि ६३५ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणेसह जिल्ह्यातील पालिकांसह रत्नागिरी पालिकेने सुयोग्य नियोजन केले आहे. रत्नागिरी शहरात ८ कृत्रिम तलाव आणि दोन गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारली आहेत. मात्र ज्यांना गणेशाचे समुद्रात विसर्जन करायचे आहे, अशा कुटुंबातील फक्त दोघांनाच समुद्रावर जाण्याची मुभा पोलिस यंत्रणेने दिली आहे.

गणेशोत्सवावर कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी पालिकांनी नियोजन केले आहे. दीड व पाच दिवसांच्या घरगुती गणपतींच्या विर्सजनासाठी आठ कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. यामध्ये माळनाका जीम, (कै.) प्रमोद महाजन क्रीडासंकुल, लक्ष्मीचौक गार्डन गाडीतळ, शाळा क्र. १७ निवखोल, नरहर वसाहत उद्यान, जोगळेकर कॉलनी उद्यान, छत्रपतीनगर उद्यान, नुतननगर उद्यान, विश्वनगर उद्यान या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच देवज्ञ भवन, नाचणे तलाव, मच्छीमार्केट झारणी रोड या ठिकाणच्या नैसर्गिक तलावात विसर्जनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

रत्नागिरी पालिकेच्या हेल्पलाईनवर साधा संपर्क
समुद्रावर विसर्जन न करणाऱ्या नागरिकांच्या गणेशमुर्तीचे घरोघरी जाऊन संकलन केले जाणार आहे. गणेशमूर्ती घरोघरी संकलित करून त्यांचे निश्‍चितस्थळी विसर्जन करण्याचे पालिकेने ठरविले आहे. दीड दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याकरीता २६ ऑगस्टपर्यंत सायंकाळी ५ वाजता पालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करण्याची व्यवस्था केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com