सक्षणा सलगर आणि सुषमा अंधारे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक

सक्षणा सलगर आणि सुषमा अंधारे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्टार प्रकारकांची यादी जाहीर केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच डी. पी. त्रिपाठी, शंकरसिंह वाघेला यांच्यासह चाळीस प्रचारकांचा यात समावेश आहे. सक्षणा सलगर, सुषमा अंधारे या नव्या चेहऱ्यांपासून ते विद्या चव्हाण यांच्यासारख्या जाणत्या महिला नेत्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

सक्षण या उस्नानाबाद जिल्ह्यातील तेर या गावच्या आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत. राष्ट्रवादीच्या युवती काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले होते. आपल्या आक्रमक भाषण शैलीने त्या चांगल्या वक्त्या म्हणून पुढे आल्या आहेत.

सुषमा अंधारे या गणराज्य संघटनेमार्फत भटक्यांच्या प्रश्नांसाठी कार्यरत आहेत. आक्रमक वक्त्या म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. 

पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, भास्कार जाधव, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, सचिन आहिर, मधुकर पिचड, माजी प्रदेशाध्यक्ष अरूण गुजराथी, अण्णा डांगे, हसन मुश्रीफ, डॉ. अमोल कोल्हे, दिलीप सोपल, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, नवाब मलिक, फौजियाखान, धीरज शर्मा, शब्बीर विद्रोही, अब्दुल मजिद मेमन, अनिल देशमुख, विद्या चव्हाण, प्रकाश गजभिये, वर्षा पटेल, सुषमा अंधारे, चित्रा वाघ, जयदेव गायकवाड, गफार मलिक, ईश्‍वर बाळबुधे, प्रदीप सोळुंखे, सक्षणा सलगर, जयंत पटेल यांचा या यादीत समावेश आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com