शेखर गोरेंना विधानपरिषदेवर घेण्याच्या हालचाली

शेखर गोरेंनी माण मतदारसंघात विरोधकांना थोपवत जिथे असेल तिथे प्रामाणिकपणे काम करत पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. तेच काम त्यांनी जिल्ह्यात करून दाखवत शिवसेना पक्ष मजबूत करावा. या आक्रमक नेत्याला बळ देत विधानपरिषदेवर घेण्याच्या हालचाली शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत.
Shekhar Gore
Shekhar Gore

बिजवडी (ता. माण) : विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी रिक्त झालेल्या चार जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत. यासाठी शिवसेनेमधील अनेक मातब्बर मंडळी इच्छुक असून अनेकांनी पक्ष प्रमुखांसह वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून जोरदार फिल्डींग लावली आहे. यात माण-खटावचे शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्याही नावाची चर्चा आहे. माण मतदारसंघासह जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी त्यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांचा विधानसभेतील पराभव भरून काढला जाणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी शेखर गोरे यांचे जवळचे संबंध आहेत. एक आक्रमक व्यक्तिमत्व व दुष्काळी भागातील जनतेची टँकरच्या माध्यमातून तहान भागवणारा, स्वखर्चाने विविध विकास कामे करणारा नेता म्हणून शेखर गोरेंची राज्यभर ओळख आहे.

मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी शेखर गोरेंनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून माण विधानसभा मतदारसंघासाठी शेखर गोरेंची उमेदवारी जाहीर केली होती. राज्यात शिवसेना- भाजपा युती झाल्यानंतर माण विधानसभा मतदारसंघ भाजपकडे गेला. तरीही पक्ष प्रमुखांनी शेखर गोरेंना दिलेला शब्द माघारी घेतला नाही. शेखर गोरेंचे कार्य पाहून त्यांना शिवसेनेचीच उमेदवारी देत दिलेला शब्द खरा करून दाखवला.

खराब हवामानामुळे पहिल्या दिवसाची सभा रद्द झाल्यानंतर मोबाईलवरून जनतेशी संवाद साधत मी तुमच्या भेटीला उद्या येतोय म्हणत पुन्हा दुसऱ्या दिवशी उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत रेकॉर्डब्रेक सभा झाली. मात्र, या निवडणूकीत शेखर गोरेंना पराभवाचा सामना करावा लागला. जनतेसाठी एवढ्या तळमळीने स्वखर्चातून काम करणाऱ्या नेत्याला पराभव सहन करावा लागला. हा पराभव शेखर गोरेंसह मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्याही जिव्हारी लागला. तरीही हताश न होता शेखर गोरेंनी पक्षसंघटना मजबूत करत माण पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवला.


ज्याप्रमाणे शेखर गोरेंनी माण मतदारसंघात विरोधकांना थोपवत जिथे असेल तिथे प्रामाणिकपणे काम करत पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. तेच काम त्यांनी जिल्ह्यात
करून दाखवत शिवसेना पक्ष मजबूत करावा. या आक्रमक नेत्याला बळ देत विधानपरिषदेवर घेण्याच्या हालचाली शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांचे व शेखर गोरेंचे जिव्हाळ्याचे संबंध....

शेखर गोरेंनी स्वखर्चातून विकासकामे करत राज्यभर आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. याच त्यांच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी
त्यांचे कौतुक केले होते. त्यानंतर या दोघांच्यात जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. जिल्ह्यात शिवसेनेला पक्षवाढीसाठी आक्रमक नेत्याची गरज असून शेखर गोरेंच्या
माध्यमातून त्यांच्याकडे चेहरा आहे. त्यामुळे त्यांना ताकद देत विधानपरिषदेवर घेतले जाऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com