Relife In lockdown
Relife In lockdown

सातारा लॉकडाऊन : विषम तारखांना सर्व दुकाने उघडण्यास परवानगी 

ग्रामपंचायत हद्दीतील मद्यविक्री अटींच्या अधिन राहून सुरु ठेवण्यास मुभा राहिल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. संबंधिताचा परवाना तात्काळ कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सातारा : लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर सर्व आस्थापना उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, बाजारपेठेत अनावश्‍यक गर्दी होऊ लागल्याने पाच
हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 66 ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील दुकाने आता केवळ विषम तारखांना उघडी राहणार आहेत, अशी माहिती साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. 

लॉकडाऊन शिथिल करताना सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, नागरीकांची गर्दी होऊ लागल्याने पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये बदल केला
आहे. अत्यावश्‍यक सेवा, कृषीशी संबंधित दुकाने आता सकाळी अकरा ते सायंकाळी सहा यावेळेत सुरू राहणार आहेत. तर उर्वरित सर्व दुकाने विषम तारखांना सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेतच सुरू राहणार आहेत.

हा आदेश जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 66 गावांत लागू असेल. यामध्ये सातारा तालुक्‍यातील लिंब, खेड, शाहुपूरी, कोडोली, संभाजीनगर, देगाव, नागठाणे, अतित, काशिळ. कोरेगाव तालुक्‍यातील कुमठे, पाडळी स्टेशन, पिंपोडे बु, वाठार (किरोली), वाठार स्टेशन, माण तालुक्‍यातील पळशी, गोंदवले बुद्रुक, बिदाल. फलटण तालुक्‍यातील आसू, विडणी, कोळकी, गुणवरे, बरड, गिरवी, सांगवी, पाडेगाव, तरडगांव, साखरवाडी (पिंपळवाडी).

खंडाळा तालुक्‍यातील शिरवळ. वाई तालुक्‍यातील बावधन, भुईंज, ओझर्डे, पसरणी, यशवंतनगर. जावली तालुक्‍यातील कुडाळ. कराड तालुक्‍यातील आटके, ओंड, उंब्रज, बनवडी, चरेगाव, गोळेश्वर, काले, कार्वे, विंग, कोपर्डे हवेली, मसूर, मुंढे, पाल, रेठरे बु, सदाशिवगड, सैदापूर, शेरे, तांबवे,वडगाव हवेली, वारुंजी. खटाव तालुक्‍यातील बुध, खटाव, पुसेगाव, चितळी, मायणी, कलेढोण, कुरोली (सिद्धेश्वर), निमसोड, पुसेसावळी, औंध व पाटण तालुक्‍यातील तारळे या गावांचा समावेश आहे. 

या आदेशानुसार या ग्रामपंचायत हद्दीतील हॉस्पिटल्स, नर्सिंग होम व खासगी डॉक्‍टरचे क्‍लिनिक (ओपीडी) 24 तास सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील किरणा दुकाने, औषधांची दुकाने (मेडिकल) शेती संबंधी औषधांची दुकाने, खते व बी-बियाणांची दुकाने दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेतच सुरु ठेवावित.

उर्वरित सर्व प्रकारच्या आस्थापना, दुकाने केवळ विषम तारेखस सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेतच चालू राहतील. ग्रामपंचायत हद्दीतील मद्यविक्री अटींच्या अधिन राहून सुरु ठेवण्यास मुभा राहिल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात येणारआहे. संबंधिताचा परवाना तात्काळ कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com