धोका कायम : साताऱ्यात पाच जणांना संसर्ग, रूग्ण संख्या ५२१ वर 

आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यात 521 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 160 रुग्ण बरे झाले आहेत. 340 रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
corona satara
corona satara

सातारा : सातारा जिल्ह्यात काल रात्री उशीरा पाच रूग्णांचे अहवाल कोरोनाबाधित आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५२१ वर गेला आहे. दरम्यान मृत्यू
झालेल्या पाच जणांचे मृत्यू पश्चात अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे एकीकडे दिलासा तर दुसरीकडे धोका अशी परिस्थिती सातारा जिल्ह्यात निर्माण झाली
आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रूग्णांची संख्या २१ झाली आहे. 

कोरोनाची साळखी जिल्ह्यात तुटेना झाली असून दररोज रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दिवसभरात कोरोनाबाधितांची संख्या फारशी वाढली नसली तरी मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले. रात्री उशीरा जिल्ह्यातील पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुण्याहून आलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

यामध्ये पाटण तालुक्यातील नवसरवाडी येथील एक ज्येष्ठ नागरीक, वाई तालुक्यातील वोव्हाळी येथील एक पुरुष व जांभळी येथील एक मुलगी, महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी येथील एक मुलगी, हरचंदी येथील ज्येष्ठ नागरीक असे एकूण पाच रुग्णांना कोविडचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर
यांनी दिली आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड येथील 57 वर्षीय पुरुष, पाथरवाडी (ता. कराड) येथील 33 वर्षीय पुरुष व बुधवार पेठ सातारा येथील 65 वर्षीय महिला, अंबेदरे
आसरे (ता. वाई) येथील 43 वर्षीय महिला तसेच उंब्रज (ता. कराड) येथील 60 वर्षीय पुरुष असे एकूण पाच जणांचे मृत्यु पश्चात घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे काहीसा दिलासा जिल्हावासियांना मिळाला आहे. 

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात काल रात्री उशिरा रांजणी (ता. जावली) येथून आलेल्या 85 वर्षीय मृत महिलेचा मृत्यु पश्चात नमुना तपासणीकरिता
पुणे येथे  पाठविला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांनी 228 तर कृष्णा मेडीकल कॉलेज कराड यांनी नऊ जणांचे रिपोर्ट असे एकूण 237 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com