अखेर जळगावचे 'हिरालाल पाटील' भाजप पदाधिकाऱ्यांना सापडले

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकारिणीत सोशल मिडीया विभागात जळगाव जिल्ह्यातून हिरालाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते जिल्हयातील कोणत्या गावचे आहेत? याबाबत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना माहिती नव्हती. भाजप राज्य युवा कार्यकारिणीतील हिरालाल पाटील कोण? स्थानिक कार्यकर्त्यांनाही त्याची माहिती नाही असे वृत्त 'सरकारनामा'ने प्रकाशित केले होते
BJP Lotus Symbol
BJP Lotus Symbol

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीतील सोशल मिडीया विभागात निवड झालेले हिरालाल पाटील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील गोरखेडा येथील रहिवासी असल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना दिली.

भारतीय जनता पक्षाच्या विविध आघाड्यांची राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यात पक्षाच्या युवा मोर्चाची कार्यकारिणीही नुकतीच जाहिर करण्यात आली होती. यात युवा मोर्चाच्या कार्यकारिणीत सोशल मिडीया विभागात जळगाव जिल्ह्यातून हिरालाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते जिल्हयातील कोणत्या गावचे आहेत? याबाबत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना माहिती नव्हती. भाजप राज्य युवा कार्यकारिणीतील हिरालाल पाटील कोण? स्थानिक कार्यकर्त्यांनाही त्याची माहिती नाही असे वृत्त 'सरकारनामा'ने प्रकाशित केले होते.

'सरकारनामा'तील वृत्ताची दखल घेवून भाजप युवा मोर्चाचे युवा कार्यकारिणीचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी याबाबत सांगितले, कि भारतीय जनता पार्टीच्या विविध मोर्चे तथा आघाड्यांच्या कार्यकारणी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. यामधील भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकारणीमध्ये सोशल मीडिया विषयाची संयोजक म्हणून जबाबदारी हिरालाल पाटील यांना देण्यात आली आहे. 

हिरालाल पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालक्यातील गोरखेडा येथील रहिवासी असून सध्या ते पुणे येथे वास्तव्यास आहेत. त 'आयटी' विषयाचे तज्ञ असून गेल्या चार वर्षांपासून ते भारतीय जनता युवा मोर्चाच्या विविध उपक्रम तथा अभियानामध्ये सहभागी आहेत तसेच विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. याची दखल घेऊनच भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकरणीवर सोशल मीडिया संयोजक म्हणून जबाबदारी देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिरालाल पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून भाजप युवा मोर्चाचे कार्य करित आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवूनच त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याबाबत असेला संभ्रम आता दूर झाला आहे. 
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com