खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजप कार्यालयाचे कुलूपच उघडले गेले नाही... - After Khadse joined NCP, the lock of BJP office was not opened | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजप कार्यालयाचे कुलूपच उघडले गेले नाही...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा परिणाम दिसला....

मुक्ताईनगर : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा परिणाम दुसऱ्याच दिवशी दिसून आला. खडसे रहिवासी असलेल्या मुक्ताईनगर गावात भाजप कार्यालयाचे कुलूप उघडले गेले नाही. त्यामुळे भाजप कार्यालयाला कुलूप याची मोठीच चर्चा झाली.

खडसे यांच्या या मतदारसंघात खडसे हे भाजप सोडणार, याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनातही चलबिचल होती. खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर  मुक्ताईनगर मधील भाजपचे  काय होईल, याची अनेकांना उत्सुकता होतीच. खडसेंच्या अपेक्षेप्रमाणे घडले. या कार्यालयाचे कुलूप आज उघडले गेले नाही. 

या मतदारसंघात खडसे यांना वैयक्तिक मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने खडसेंवर भाजपने केलेला अन्यायाच्या विरोधात खडसेंबरोबर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने मुक्ताईनगर शहरात भाजप कार्यालय उघडण्यासाठी सुद्धा भाजपचा कार्यकर्ता उरला नसल्याचे चित्र आहे. खडसे याच गावात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणी थेटपणे जाईल, याची शक्यता नव्हतीच. या गावात राष्ट्रवादीचेही कार्यालय असून तेथे खडसेंचे कार्यकर्ते कधीपासून तेथे दिसणार, याची उत्सुकता आहे. 

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर ते आज मुंबईतून सकाळी निघाले. त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले. अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत खडसेंनी भाजप नेत्यांच्या विरोधातील टीका कायम ठेवली. राम शिंदे हे बच्चा असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आपण गांभीर्याने घेत नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादीत आपण पदाच्या अपेक्षेने आलेलो नसून इतर कोणतीही जबाबदारी दिली तरी ती स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले. खडसेंचे वाग्बाण आज भाजपच्या नेत्यांना घायाळ करणार ठरले. आगामी काळात आपण भाजपला कसे नामोहरम करणार, याची चुणूक राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी दाखवली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख