शहादा पालिकेतील तीन नगरसेवकसह तालुक्यातील १९ सरपंच राष्ट्रवादीत  - 19 sarpanches with three corporators of Shahada municipality join NCP | Politics Marathi News - Sarkarnama

शहादा पालिकेतील तीन नगरसेवकसह तालुक्यातील १९ सरपंच राष्ट्रवादीत 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 17 जून 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच लोकभावनेचा विचार करुन संधी देणारा पक्ष आहे. आज झालेल्या पक्षप्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा नव्याने उभारी घेण्याचे काम आपण एकत्र मिळून करू. 

जळगाव : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील शहादा येथील भाजपच्या BJP तीन नगरसेवकांसह तालुक्यातील १९ सरपंचांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षात प्रवेश केला.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांच्या प्रमुख उपस्थितीत व नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे Dr. Abhijit More यांच्या पुढाकाराने नंदुरबार जिल्ह्यातील नगरसेवक व सरपंचांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 19 sarpanches with three corporators of Shahada municipality join NCP

यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. नंदुरबार जिल्हा पक्षाच्या मागे खंबीरपणे उभा होता. मात्र मागील काळातील काही घडामोडींमुळे हे चित्र बदलले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच लोकभावनेचा विचार करुन संधी देणारा पक्ष आहे. आज झालेल्या पक्षप्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा नव्याने उभारी घेण्याचे काम आपण एकत्र मिळून करू. नंदूरबार जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत उभा असल्याचे चित्र निर्माण करू, असे जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा..साडेतीन तासापासून चैाकशी सुरु

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, नंदुरबार जिल्हा निरीक्षक नानासाहेब महाले उपस्थित होते. दरम्यान, शाहादा नगरपालिकेतील नगरसेविका सहीदा बी अन्सारी, नगरसेवक सैय्यद सायरा बी अली लियाकत अली,  नगरसेविका सुमन पवार, सपना शेवाळे, बुधा ठाकरे, ईश्वर ठाकरे, संग्राम ठाकरे, शंकर वाघ, अनुबाई सोनवणे, भिवाजी ठाकरे, सुरेश ठाकरे, गोवर्धन ठाकरे, कैलास पवार, महेंद्र शेवाळे, सुनील पवार, रविंद्र पडवी, भरत ठाकरे, सुभाष शेवाळे, भुपेंद्र पवार, संतोष शेवाळे, रविंद्र ठाकरे, गणेश भिव यांनी यावेळी पक्षप्रवेश केला.

आवश्य वाचा  : खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांची वीज कापणे म्हणजे सरकारच्या क्रुरतेचा कळस…

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख