अबब! गोकुळच्या मतदानासाठी फक्त पाच मतदार गैरहजर.. काय होणार महाडिकांचे आणि पाटलांचे? - As gokul facing tough fight high turnout for voting | Politics Marathi News - Sarkarnama

अबब! गोकुळच्या मतदानासाठी फक्त पाच मतदार गैरहजर.. काय होणार महाडिकांचे आणि पाटलांचे?

सुनील पाटील
रविवार, 2 मे 2021

जिल्ह्यातील सात तालुक्‍यात शंभर टक्‍के मतदान झाले. 

कोल्हापूर : केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीलेल्या जिल्ह्यातील प्रमुख अर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी आज इर्षेने 99.78 टक्के मतदान झाले. एकूण 3647 ठरावदारांपैकी 3639 ठरावदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तीन ठरावदारांचा यापुर्वीच कोरोनाने मृत्यु झाला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्‍या तालुक्‍यात सत्तारूढ व विरोधी आघाडीच्या कार्यकर्त्यांत टोकाची इर्षा बघायला मिळाली. करवीर तालुक्‍यातील बारा मतदान केंद्रावर दुपारी 3.40 पर्यंत शंभर टक्के मतदान पूर्ण झाले.

 
दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. 4) सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा येथील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात होणार असून या निकालाबाबत जिल्ह्यात कमालीची उत्सुकता आहे. दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होईल. 
"गोकुळ' च्या संचालक पदाच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होती. 21 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात उतरले होते. सत्तारूढ गटाविरोधात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडिलक यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनी एकत्र येऊन मोट बांधली होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता जिल्ह्यात आहे. 

जिल्ह्यातील 12 तालुक्‍यातील 70 केंद्रावर आज मतदान झाले. प्रत्येक केंद्रावर 50 ठरावदारांच्या मतदानाची सोय करण्यात आली होती. तथापि तालुक्‍यात शक्‍तीप्रदर्शनार्थ दोन्ही बाजूंनी एकत्रच ठरावदारांना मतदान केंद्रावर आणल्याने कोरोना विषयक नियमांचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले. गेल्या दोन महिन्यापासून गोकुळच्यानिमित्ता सत्तारूढ आणि विरोधकांवर राजकीय चिखलफेक सुरु होती. गोकुळ निवडणूक रद्द व्हावी यासाठी सत्तारूढसह काही संस्था उच्च व सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. मात्र,न्यायालयाने निवडणूक रद्द न करता 70 मतदान केंद्रावर मतदान घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानूसार आजची निवडणूक झाली. 

सत्ताधाऱ्यांची पांढरी तर विरोधकांची पिवळी टोपी 
या निवडणुकीसाठी सर्वच तालुक्‍यात सत्तारूढ आघाडीच्या ठरावदारांनी डोक्‍यावर पांढरी टोपी तर तोंडावर पांढरा मास्क लावून मतदान केंद्रावर प्रवेश केला तर विरोधी आघाडीच्या ठरावदारांच्या डोक्‍यावर पिवळी टोपी, तोंडावर पिवळा मास्क तर गळ्यात पिवळा दुपट्टा घालून मतदानासाठी आले होते. 
........ 
सात तालुक्‍यात 100 टक्के मतदान : 
गोकुळसाठी करवीर, कागल, चंदगड, हातकणंगले, गडहिंग्लज, पन्हाळा, शिरोळ या सात तालुक्‍यात शंभर टक्के मतदान झाले. प्रत्येक ठरावदार मतदाराला फोन करुन तो कुठे आहे. त्याला घ्यायला वाहन पाठवू का? अशी विचार पूस करून सर्व नेते आणि उमेदवार आपआपल्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत होते. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील सात तालुक्‍यात शंभर टक्‍के मतदान झाले. 
.. 

गोकुळसाठी झालेले तालुकानिहाय मतदान व टक्केवारी 
तालुका* एकूण ठरावदार मतदार* महिला* पुरुषएकूण झालेले मतदानटक्केवारी 
गगनबावडा*76*20*55*75*98 
हातकणंगले*95*28*67*95*100 
शिरोळ*133*35*98*133*100 
राधानगरी*458*111*346*457*99.78 
गडहिंग्लज*272*78*194*272*100 
शाहुवाडी*286*64*221*285*99.65 
पन्हाळा*353*76*277*353*100 
आजरा*233*60*172*232*99.57 
करवीर*639*160*479*639*100 
भुदरगड*373*89*280*369*98.93 
चंदगड*346*77*269*346*100 
कागल*383*89*294*383*100 
एकूण*3647*887*2752*3639*99.78 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख