कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी नक्षलवादाचा ठपका ठेवून लोकांना तुरूंगात टाकले: जिग्नेश मेवामी

कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी नक्षलवादाचा ठपका ठेवून लोकांना तुरूंगात टाकले: जिग्नेश मेवामी

कोलकोता : कोरेगाव-भिमा दंगलप्रकरणी कार्यकर्त्यांना नक्षलवादी असल्याचा ठपका ठेऊन तुरूंगात टाकले त्यांची सुटका करण्याचे काम आम्हाला करायचे आहे. देशभरातील सेक्‍युलर पक्षांचे सरकार दिल्लीत सत्तेवर आल्यानंतर पहिले काम ते करायचे आहे. त्यासाठी आगामी निवडणुकीत भाजप-आरएसएसला पराभूत करा असे आवाहन गुजरातमधील दलितांचा आवाज आणि आमदार जिग्नेश मेवानी यांनी आज येथे केले. 

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कोलकातात मोदी विरोधकांना एकत्र घेऊन जाहीरसभा आयोजित केली होती. या सभेत केजरीवाल मेवामी बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, फारूख अब्दुल्ला, शरद यादव, अखिलेश यादव, मुख्यमंत्री कुमारस्वामी, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा आदी रथीमहारथी नेते यावेळी उपस्थित होते. 

मेवामी म्हणाले, ""सध्या देश हा मोठ्या संघर्षाला सामोरे जात असून भाजपच्या साडेचार वर्षांच्या राजवटीत गरीब, अल्पसंख्याक आणि दलितांचे मोठे शोषण झाले आहे. प्रादेशिक पक्षांच्या या महाआघाडीमध्ये भाजपला पराभूत करण्याचे सामर्थ्य आहे. केंद्रात महाआघाडीचेच सरकार येईल. त्यानंतरच राज्यघटनेची योग्य अंमलबजावणी होऊन देश खऱ्या अर्थाने समाजवादी प्रजासत्ताक बनेल.  '' 

चोरांविरोधात लढत आहोत : हार्दीक पटेल

कधीकाळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गोऱ्यांविरोधात लढाईची हाक दिली होती, आम्ही आता चोरांविरोधात लढत आहोत. सर्व विरोधी पक्षांना एकाच व्यासपीठावर आणल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे आभार. या सभेला जमलेल्या गर्दीतून हे स्पष्ट होते की भाजपची आता जाण्याची वेळ झाली आहे. 
हार्दीक पटेल, पाटीदार नेते  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com