jignesh mevami alligation modi bhima koregaon | Sarkarnama

कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी नक्षलवादाचा ठपका ठेवून कार्यकर्त्यांना तुरूंगात टाकले: जिग्नेश मेवामी 

वृत्तसंस्था
शनिवार, 19 जानेवारी 2019

कोलकोता : कोरेगाव-भिमा दंगलप्रकरणी कार्यकर्त्यांना नक्षलवादी असल्याचा ठपका ठेऊन तुरूंगात टाकले त्यांची सुटका करण्याचे काम आम्हाला करायचे आहे. देशभरातील सेक्‍युलर पक्षांचे सरकार दिल्लीत सत्तेवर आल्यानंतर पहिले काम ते करायचे आहे. त्यासाठी आगामी निवडणुकीत भाजप-आरएसएसला पराभूत करा असा असे आवाहन गुजरातमधील दलितांचा आवाज आणि आमदार जिग्नेश मेवानी यांनी आज येथे केले. 

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कोलकातात मोदी विरोधकांना एकत्र घेऊन जाहीरसभा आयोजित केली होती.

या सभेत केजरीवाल मेवामी बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, फारूख अब्दुल्ला, शरद यादव, अखिलेश यादव, मुख्यमंत्री कुमारस्वामी, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा आदी रथीमहारथी नेते यावेळी उपस्थित होते. 

मेवामी म्हणाले, ""सध्या देश हा मोठ्या संघर्षाला सामोरे जात असून भाजपच्या साडेचार वर्षांच्या राजवटीत गरीब, अल्पसंख्याक आणि दलितांचे मोठे शोषण झाले आहे. प्रादेशिक पक्षांच्या या महाआघाडीमध्ये भाजपला पराभूत करण्याचे सामर्थ्य आहे. केंद्रात महाआघाडीचेच सरकार येईल. त्यानंतरच राज्यघटनेची योग्य अंमलबजावणी होऊन देश खऱ्या अर्थाने समाजवादी प्रजासत्ताक बनेल.  '' 

चोरांविरोधात लढत आहोत : हार्दीक पटेल

कधीकाळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गोऱ्यांविरोधात लढाईची हाक दिली होती, आम्ही आता चोरांविरोधात लढत आहोत. सर्व विरोधी पक्षांना एकाच व्यासपीठावर आणल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे आभार. या सभेला जमलेल्या गर्दीतून हे स्पष्ट होते की भाजपची आता जाण्याची वेळ झाली आहे. 
हार्दीक पटेल, पाटीदार नेते 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख