जेटली आठवडाअखेर भारतात परतणार 

  जेटली आठवडाअखेर भारतात परतणार 

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री अरुण जेटली हे या आठवड्यात भारतात परत येणार असल्याचे सूत्रांनी मंगळवारी सांगितले. 

वैद्यकीय उपचारांसाठी जेटली हे अमेरिकेला गेले आहेत. जेटली यांची प्रकृती सुधारत असून डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार या आठवडाअखेर ते भारतात परतण्याची शक्‍यता आहे. पुढील आठवड्यात ते संसदेतही उपस्थित राहू शकतील, असे सांगण्यात आले. 

मोदी सरकारचा सहावा व शेवटचा अर्थसंकल्प जेटली या वेळी सादर करू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. जेटली उपचारांसाठी अमेरिकेत असले तरी ते ट्‌विटर व फेसबुकद्वारे सोशल मीडियावर सक्रिय आहे. न्यूयॉर्कमधून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला होता. अर्थसंकल्पावर त्यांनी मुलाखतीही दिल्या आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com