jdu mumbai | Sarkarnama

संयुक्त जनता दलात पक्षबांधणीअगोदरच नवा वाद शक्‍य

महेश पांचाळ
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुंबई : समाजवादी आणि डाव्या विचारसरणीच्या मंडळींना भाजपविरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्न नीतिश कुमार यांच्या जेडीयुकडून महाराष्ट्रात सुरू असला तरी वास्तवात नेत्यांचे झेंडे आणि काही कामगार संघटना या जेडीयुत सामील झाल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकभारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी नितीन कुमार यांच्या जनता दलामध्ये पक्ष विलीन केल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व समाजवादी विचारसरणीच्या मंडळींना एकत्र आणण्याचे काम पाटील यांच्याकडून केले जात आहे. गोरेगाव येथे शनिवारी मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजारो पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कपिल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील कामगार चळवळीतील नेतेमंडळी आणि पदाधिकारी निमंत्रित म्हणून उपस्थित होते. परंतु ही मंडळी जेडीयुत सामील झाली असे चित्र उभे राहिले होते. 

जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर म्हणाले की जनता दलाच्या पूर्वाश्रमीच्या नेत्यांना एकत्र करून भाजपविरोधी ताकद निर्माण करण्याचे प्रयत्न केंद्रीय पातळीवर सुरू आहेत. नीतिश कुमार यांच्या कार्यक्रमाला निमंत्रण होते म्हणून आम्ही हजर राहिलो. जनता दल पक्षाचे मुंबईतील अस्तित्व कायम असून कोणी अपप्रचार करत असेल तर चुकीचे आहे.

कम्युनिस्ट पक्षाच्या निगडित कामगार संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे विश्वास उटगी यांनाही जेडीयुत आपण सामील झालो नाही असा खुलासा करावा लागला आहे. माथाडी कामगार संघटनांचे नेते अविनाश रामिष्ठे हे या मेळाव्याला उपस्थित होते. कॉंगेसचे त्यांच्या युनियनला पाठबळ राहिलेले आहे. त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र त्यांच्याकडून जेडीयुत सहभागी होण्याबाबत अनुकूलता नसल्याचे समजते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख