jdu | Sarkarnama

महाराष्ट्रात पाय रोवताना जेडीयूमध्ये गटबाजी होण्याची शक्‍यता

महेश पांचाळ
मंगळवार, 11 एप्रिल 2017

मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीनकुमार यांच्या जेडीयू पक्षाने महाराष्ट्रात पक्षांचे जाळे पसरविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. येत्या 22 एप्रिल 2017 रोजी गोरेगांव येथे होणाऱ्या मेळाव्याला स्वत: नितिनकुमार उपस्थित राहणार आहेत. यापुर्वी महाराष्ट्रातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका तत्कालीन जेडीयुचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद यादव यांच्या शिफारसीने केल्या जात होत्या. सध्याच्या नेमणूका या नितीन कुमार यांच्या सल्ल्यानुसार होत असल्याने महाराष्ट्रात पाय रोवताना जेडीयूमध्ये शरद यादव आणि नितीन कुमार यांचे समर्थकांमधील गटबाजी उफाळून येण्याची शक्‍यता आहे.

लोकभारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी आपला पक्ष नितीन कुमार यांच्या जेडीयूमध्ये विलीनीकरण केल्यानंतर, जेडीयुचे महाराष्ट्र संयोजक म्हणून कपिल पाटील यांनी पक्षांचा विस्तार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुर्वी जेडीयूच्या नावावर महाराष्ट्रात कोणीही आमदार निवडून आला नव्हता. परंतु, कपिल पाटील यांच्यामुळे महाराष्ट्र विधान परिषदेत जेडीयूचे सदस्य म्हणून नोंद झालेली आहे. पक्ष वाढीचा एक भाग म्हणून मुंबई संयोजकपदी कामगार नेते शशांक शरद राव यांची सोमवारी नेमणूक करण्यात आली आहे. कामगार नेते दिवंगत शरद राव यांचे मुंबई शहरातील कामगार क्षेत्रात मोठे नेटवर्क आहे. शरद राव यांच्या पश्‍चात शशांक राव , महाबळ शेट्टी हे कामगार क्षेत्रात कार्यरत असताना, पक्ष वाढीसाठी त्याचा कितपत फायदा होतो हे लवकरच कळेल. गोरेगांव येथे 22 एप्रिल रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याला महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून 10 हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र संयोजक कपिल पाटील यांनी मुंबईत आज दिली.
नितीन कुमार यांच्या मुंबई दौऱ्यांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला जेडीयुचे मुंबई अध्यक्ष किसन दुबे उपस्थित नव्हते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन कुमार यांनी जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर 12 राज्यातील अध्यक्षांची उचलबांगडी केली होती. हे सर्व प्रमुख पदाधिकारी खासदार शरद यादव यांच्या विश्‍वासातील होते. महाराष्ट्रातील जेडीयुची यापुर्वी निवड झालेली कार्यकारणी ही शरद यादव समर्थक म्हणून ओळखली जाते. त्यातून महाराष्ट्र  मुंबई अध्यक्ष पदावर नेमणूक करताना घटनात्मक पेच निर्माण होउ नये म्हणून नव्याने पक्षात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संयोजक या पदावर नियुक्त केले जात आहे. जेडीयूमध्ये सध्या नितीन कुमार यांच्या शब्दाला किंमत असल्याने शरद यादव समर्थक अस्वस्थ असून, पक्षवाढीचे काम करताना पक्षांतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्‍यता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख