...आणि देवेगौडांनी शिरुर-आंबेगासह राज्यातील 'त्या' दहा जागांबद्दल आंबेडकरांना सांगूनही टाकले 

माजी पंतप्रधान व जनता दल (सेक्यूलर) चे नेते एच.डी.देवेगौडा यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. राज्यात आणि देशात भाजपा व मित्रपक्षांनी मिळविलेल्या लोकसभा निवडणूकीतील यशानंतर वंचित विकास आघाडी, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची भूमिका नेमकी काय याबाबत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. दहा दिवसांपूर्वी जनता दल सेक्यूलरचे युवा प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी वंचितकडून आंबेगाव-शिरुर मधून आपली उमेदवारी निश्चित झाल्याचे जाहीर केले होते.
...आणि देवेगौडांनी शिरुर-आंबेगासह राज्यातील 'त्या' दहा जागांबद्दल आंबेडकरांना सांगूनही टाकले 

शिक्रापूर : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव-शिरुरसह राज्यातील दहा जागांवर तुम्ही आम्हाला पाठींबा द्या आणि बाकी ठिकाणी आम्ही तुम्हाला देतोय.. असे म्हणत माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी वंचितचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर यांना फोन करुन सांगितले आणि त्याला आंबेकरांनीही तत्वत: मान्यता दिली. पर्यायाने राज्यात वंचित कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाणार की, नाही याचा निर्णय अद्य्याप झालेला नसला तरी जनता दलाचा (सेक्युलर) मात्र वंचितमध्ये जाण्याचा निर्णय अंतीम टप्प्यात आला आहे.

माजी पंतप्रधान व जनता दल (सेक्यूलर) चे नेते एच.डी.देवेगौडा यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. राज्यात आणि देशात भाजपा व मित्रपक्षांनी मिळविलेल्या लोकसभा निवडणूकीतील यशानंतर वंचित विकास आघाडी, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची भूमिका नेमकी काय याबाबत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. दहा दिवसांपूर्वी जनता दल सेक्यूलरचे युवा प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी वंचितकडून आंबेगाव-शिरुर मधून आपली उमेदवारी निश्चित झाल्याचे जाहीर केले होते. याच पार्श्वभूमिवर कालच्या दौ-यात देवेगौडा यांनी आंबेगाव-शिरुरबाबत नेमकी प्रतिक्रिया काय दिली याबाबत उत्सूकता होती. 

त्यालाच अनुसरुन आज शेवाळे म्हणाले, "देवेगौडा यांनी पुणे ते लोहगाव विमानतळ या प्रवासाचे दरम्यान डॉ.आंबेडकर यांना फोन करुन सांगितले की, आमच्या राज्यातील दहा जागा आम्ही निश्चित केलेल्या आहेत. आंबेगाव-शिरुर, दौंड व हडपसर या पुणे शहर व जिल्ह्यातील तीन जागांसह मिरज (सांगली), भूमपरांडा (उस्मानाबाद), मालेगाव (नाशिक), गडहिंग्लज (कोल्हापूर), चांदूर (अमरावती), नागपूर (नागपूर) व पालघर (जि.पालघर) या जागांवर आम्ही उमेदवारही निश्चित केलेले आहेत. या दहा जागांवर तुम्ही आम्हाला पाठींबा द्या आणि आम्ही तुम्हाला उर्वरित महाराष्ट्रातील सर्व जागांवर पाठींबा देवू.''

दरम्यान या संपूर्ण संभाषणाला डॉ.आंबेडकर यांनीही तत्वता: मान्यता दिली असून वरील दहा जागांसाठी जनता दलाचेच चिन्ह वापरणार असल्याचेही देवेगौडा यांनी निक्षून सांगितल्याची माहिती शेवाळे यांनी दिली. दरम्यान, कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांचेसमवेत जायचे की, नाही याबाबतही देवेगौडा यांनी आंबेडकर यांना सांगितले असून सदर बाब मात्र उघडपणे बोलण्याची नसल्याचेही शेवाळे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com