jaywantrao jagtap power story | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

जयवंतराव जगतापांची करमाळ्यातील सत्ता जाणार की राहणार? 

अण्णा काळे 
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

बागल गट सत्ता परिवर्तन घडवणार?

करमाळा (सोलापूर): करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता विद्यमान सभापती तथा माजी आमदार जयवंतराव जगताप टिकवणार की बागल गट सत्ता परिवर्तन घडवणार? या विषयी सध्या करमाळा तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

दोन्ही गटाकडून सभापतीपदावर दावे केले जात आहेत. बुधवार ता.3 ऑक्टोबर रोजी सभापती निवड होणार असुन यासाठी हालचालींना वेग आला आहे. सभापती पदासाठी बागल गटाला एक तर जगताप गटाला दोन जागेची गरज आहे. 

या निवडणुकीत आमदार पाटील यांनी जगताप यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. पाटील -जगताप गटाला एकुण आठ जागा मिळाल्या (दोन बिनविरोध पकडुन), बागल गटाला आठ जागा मिळाल्या तर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे गटाला एक जागा मिळाली, शिंदे गटाला मानणा-या सावंत गटांची हमाल/तोलारची एक जागा बिनविरोध झाली आहे. 

जरी जगताप गटाकडे आठ जागा असल्या तरी जयवंतराव जगताप हे दोन जागेवर विजयी झाल्याने त्यांना एकच मत देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जगताप-पाटील गटला दोन तर बागल गटाला एका जागेची आवश्यकता आहे. 

दोन्ही गटाला जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे गटाचे चंद्रकांत सरडे व सावंत गटाचे वालचंद रोडगे यांची गरज आहे. सध्या बहुमताचा आकडा कोण कसा गाठणार ? या विषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. बागल गटाने आपले संचालक सहलीला पाठवले आहेत. एक संचालक गळाला लावण्यासाठी त्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सावंत गटाच्या दोन्ही गटाबरोबर बैठका सुरू आहेत. आज हमाल पंचायतीचे अध्यक्ष अँड राहुल सावंत व आमदार नारायण पाटील या दोघांचीच बंद खोलीत चर्चा झाली आहे. चर्चा काय झाले हे माञ बाहेर आले नाही. तर चंद्रकांत सरडे हे सभापती पदासाठी इच्छुक आहेत .त्यांच्याही दोन्ही गटबरोबर चर्चा सुरू आहेत. त्यामुळे करमाळा बाजार समीतीचा सभापती कोण? याचीच सर्वञ चर्चा सुरू आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख