शिवेंद्रसिंहराजेंनी जयवंत भोसलेंचा पत्ता टाकला!

मी राष्ट्रवादीतून लढण्यास इच्छूक आहे- जयवंत भोसले
शिवेंद्रसिंहराजेंनी जयवंत भोसलेंचा पत्ता टाकला!

सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे स्थान भक्कम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांवर आयात केलेला उमेदवार लादू नका, अशी आवाहन जिल्हा परिषद सदस्य जयवंत भोसले यांनी केली आहे.

यासंदर्भात श्री. भोसले यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपवासी झाल्यानंतर भाजपने त्यांची उमेदवारी निश्‍चित केली. त्यामुळे राष्ट्रवादीतून उमेदवार कोण, याची चर्चा सुरु आहे.  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली असताना त्यांना विरोध करत काहीजण राष्ट्रवादीत येण्याचा प्रयत्नात आहेत. त्यामुळे सातारा व जावली तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. ज्यांनी गतवेळी भाजपमधूनच राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली आहे, त्यांना जर पक्षात घेवून विधानसभेची उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादीशी व शरद पवार यांच्या विचारांशी निष्ठा ठेऊन असलेल्या आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांवर अन्याय ठरणार आहे. 

जयवंत भोसले हे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेही निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांच्या गटातून ते पालिकेचे उपाध्यक्ष तसेच नगरसेवक होते. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे गाव असलेल्या ल्हासुर्णे जिल्हा परिषद गटातून विजय मिळविला. त्यामुळे दीपक पवारांना विरोध करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी जयवंत भोसलेंचा पत्ता खुला केला का? शशिकांत शिंदे हे ताकद देत आहेत की भोसलेंची स्वत:ची इच्छा आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com