फलटणकरांवर कटोरा घेण्याची वेळ: जयकुमार गोरे

आता माझा या जनतेला तिसरा शब्द आहे की या उत्तर माणच्या भागातील वंचित गावांत दोन वर्षात पाणी आणून दाखवणारच. -जयकुमार गोरे
ramraje_jaikumar_gore
ramraje_jaikumar_gore

बिजवडी (ता.माण) :  फलटणकरांच्या नाकावर टिच्चून आम्ही फलटणचाच खासदार निवडून आणला आहे. आता आमदारही आपला होतोय की नाही याची भीती वाटू लागल्याने आज ते हातात कटोरा घेऊन मला घ्या, मला घ्या, असे म्हणत फिरताना दिसत आहेत, असा टोला माणचे  आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजेंचा नामोल्लेख टाळून टोला लगावला.

माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी टाकेवाडी, तोंडले, जाधववाडी, बिजवडी, पाचवड, मोगराळे, अनभुलेवाडी, राजवडी आदी गावांत जनसंपर्क दौरा आयोजित केला होता.यावेळी ते बोलत होते.

आमदार जयकुमार गोरे  म्हणाले, फलटणकरांनी 25 वर्षे त्यांना आमदार केले. मात्र, फलटणच्या हक्काचे पाणी त्यांनी बारामतीला देऊन टाकले. माणवरही त्यांनीच आजपर्यंत अन्याय केला आहे. आजवर केलेल्या पापांची फळे ते भोगत आहेत. त्यांच्या नाकावर टिच्चून आम्ही फलटणचाच खासदार निवडून आणला आहे.

आता आमदार तरी आपला होतोय की नाही याची भीती त्यांना वाटू लागल्याने आज ते हातात कटोरा घेऊन मला घ्या, मला घ्या असे म्हणत फिरताना दिसत असल्याचे आमदार गोरे यांनी रामराजेंचे नाव न घेता टोला लगावला. 

आमदार  गोरे  म्हणाले, दुष्काळी माण, खटावच्या जनतेला उरमोडीच्या पाण्याचा पहिला शब्द दिला होता. तो आपण पूर्ण करून दाखवला आहे. लोकसभेच्या निवडणुकीप्रसंगी आपण माण,खटावच्या जनतेला जिहे- कटापूर सिंचन योजनेचा दुसरा शब्द दिला होता. या योजनेचे टेंडर निघून त्याच भूमिपूजनही लवकरच होत आहे. तोही शब्द पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.

आता माझा या जनतेला तिसरा शब्द आहे की या उत्तर माणच्या भागातील वंचित गावांत दोन वर्षात पाणी आणून दाखवणारच. दोन वर्षात जिहे- कटापूरचे पाणी बिजवडीसह वंचित भागातील गावात नाही, आणले तर तोंड दाखवणार नाही. जनतेच्या पाठबळामुळे जो बोलतो ते करून दाखवतो ही जयकुमारची ताकद आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com