माण उत्तर भागातील ३२ गावांचा पाणीप्रश्न अखेर निकाली  : जयकुमार गोरे

उत्तर माणधील या गावांना मिळणार जिहे कठापूरचे पाणी:धुळदेव, हिंगणी, म्हसवड, भाटकी, खडकी, वरकुटे म्हसवड, पळशी, रांजणी, झाशी, राणंद, सोकासन, शेवरी, वडगाव, बिदाल, बोडकी, शिंदी, दहीवडी, गोंदवले बुदृक, गोंदवले खुर्द, मनकर्णवाडी, दानवलेवाडी, मार्डी, भालवडी, इंजबाव, संभुखेड, पर्यंती, हवालदारवाडी, या अंशता समावेश असणाऱ्या गावांबरोबरच खुटबाव, कारखेल, शिखरशिंगणापूर, वावरहिरे, लक्ष्मीनगर, तोंडले, जाधववाडी, राजवडी, मोगराळे, बिजवडी, पांगरी, टाकेवाडी, पाचवड, हस्तनपूर, थदाळे आणि वाड्यावस्त्यांना पाणी मिळणार आहे.
Jaykumar-Gore-CM
Jaykumar-Gore-CM

सातारा : जिहे कठापूर योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देताना त्यासाठी 350 कोटींचा निधी जाहीर केल्याने माण मधील 32 गावांचा पाणीप्रश्न आज निकाली निघाला आहे. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेला शब्द आज पाळला आहे, अशी माहिती माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली यामध्ये विक्रमी वेळेत जिहे कटापूर योजनेला मंत्रिमंडळाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून ३५० कोटींचा निधी जाहीर झाला आहे. राज्यातील ही पहिलीच पाणीयोजना असून विक्रमी वेळेत सुधारित प्रशासकीय मान्यता आणि निधीही उपलब्ध झाला आहे, असे सांगून आमदार गोरे म्हणाले, माणच्या जनतेला दिलेला तिसरा शब्द पूर्ण करून मतदारसंघ दुष्काळमुक्त करण्याकडे वेगवान वाटचाल सुरू झाली आहे.

माण आणि खटाव तालुक्यांची लाईफलाईन ठरणाऱ्या जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी मी गेल्या दहा वर्षांपासून अहोरात्र काम करत होतो.  पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात जिहे-कठापूरसाठी शेकडो कोटींचा निधी मिळविला होता. या योजनेच्या वाढीव खर्चाला सध्याच्या युती सरकारने सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली.

जिहे कठापूर योजनेच्या पहिल्या टप्प्यात खटाव तालुक्यातील नेर धरणात पाणी आणून येरळा नदी प्रवाही करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात आंधळी धरणात पाणी आणून माणगंगा नदी प्रवाही करुन नदीवरील बंधारे भरुन घेण्यात येणार आहेत. आमदार गोरे म्हणाले,  पाणीप्रश्नासाठी  नेहमीच वाट्टेल तो त्याग करण्याची तयारी दाखवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माढ्याचा खासदार निवडून आणण्याचा शब्द दिला होता. मुख्यमंत्र्यांनीही माण खटावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लागेल ती मदत करण्याचा शब्द दिला होता. 

माण तालुक्याच्या उत्तर भागातील ३२ गावांना कोणत्याच योजनेचे पाणी मिळत नसल्याचे तसेच शेतकऱ्यांनी आंधळी धरणातील पाणी उचलून नेण्याचे शक्य नसल्याचे सांगून जिहे कठापूर सुधारित योजना मांडली. आंधळी धरणात आलेले पाणी उचलून टाकेवाडी परिसरातील उंच ठिकाणी साठवून वंचित राहिलेल्या माणच्या उत्तर भागातील ३२ गावांना देण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांनीही दिलेला शब्द पाळत आज  मंत्रीमंडळाच्या बैठकीत मी सादर केलेल्या या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. 

योजना सादर झाल्यापासून सर्वेक्षण आणि इतर प्रशासकीय कारवाई पूर्ण होवून विक्रमी वेळेत मान्यता आणि निधी मिळणारी राज्याच्या इतिहासातील पहिलीच पाणीयोजना आज आमच्या प्रयत्नाने मार्गी लागली .त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदर रणजितसिंह निंबाळकर यांनी माझ्या या पाठपुराव्याला न्याय दिल्याबद्दल या सर्वांचे मी  आभार मानत आहे.

उत्तर माणधील या गावांना मिळणार जिहे कठापूरचे पाणी:
धुळदेव, हिंगणी, म्हसवड, भाटकी, खडकी, वरकुटे म्हसवड, पळशी, रांजणी, झाशी, राणंद, सोकासन, शेवरी, वडगाव, बिदाल, बोडकी, शिंदी, दहीवडी, गोंदवले बुदृक, गोंदवले खुर्द, मनकर्णवाडी, दानवलेवाडी, मार्डी, भालवडी, इंजबाव, संभुखेड, पर्यंती, हवालदारवाडी, या अंशता समावेश असणाऱ्या गावांबरोबरच खुटबाव, कारखेल, शिखरशिंगणापूर, वावरहिरे, लक्ष्मीनगर, तोंडले, जाधववाडी, राजवडी, मोगराळे, बिजवडी, पांगरी, टाकेवाडी, पाचवड, हस्तनपूर, थदाळे आणि वाड्यावस्त्यांना पाणी मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com