जयकुमार गोरेंमुळे भाजप प्रवेशात रामराजेंचे नाव मागे पडले ?

माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी आमदार जयकुमार गोरेंची रामराजेंचा भाजप प्रवेश रोखण्याची खेळी यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.
ramraje_jaikumar_gore
ramraje_jaikumar_gore

सातारा : साताऱ्यातील तीन राजे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. त्यापैकी साताऱ्याचे माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, अद्याप खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रवेशाची तारीख  निश्‍चित होऊ शकलेली नाही. उदयनराजेंना दिल्लीत स्वतंत्रपणे प्रवेश करायचा आहे. 

पण रामराजेंच्या प्रवेशाची चर्चा आता मागे पडल्याचे चित्र आहे. माणचे माजी आमदार जयकुमार गोरेंच्या भाजप प्रवेशामुळे रामराजेंचे नाव मागे पडल्याची चर्चा माण, फलटण तालुक्‍यात सुरू आहे. 

राष्ट्रवादीकडून दुजाभाव आणि डावलल्याच्या भावनेतून साताऱ्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत भाजप प्रवेश केला. त्यांच्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माण-खटावचे माजी आमदार जयकुमार गोरे आणि याच दरम्यान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. 

आज सोलापूरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थित माजी आमदार गोरेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशापूर्वी त्यांनी एकदा रामराजेंवर टिकास्त्र सोडले. आता उदयनराजेंच्या प्रवेशाची चर्चा सुरू असून ते अद्याप तळ्यात मळ्यात आहेत. त्यांचे समर्थक मात्र, महाराज एकदाचा निर्णय घ्या, असे म्हणत आहेत.

 या सर्व हालचालीत रामराजेंच्या प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा मागे पडली आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेश होणार का, असा प्रश्‍न आता जिल्ह्याच्या राजकिय वर्तूळात उपस्थित होऊ लागला आहे. माजीआमदार जयकुमार गोरेंच्या भाजप प्रवेशामुळे रामराजेंचे नाव मागे पडल्याची चर्चा ही सध्या फलटण, माणमध्ये असून यासाठी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी आमदार जयकुमार गोरेंची रामराजेंचा भाजप प्रवेश रोखण्याची खेळी यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com