माणचं पाणी परत द्या, फलटणला येऊन सत्कार करीन - जयकुमार गोरे

माणचं पाणी परत द्या, फलटणला येऊन सत्कार करीन - जयकुमार गोरे

माणमध्ये निवडणुकांसाठी बैठका घेण्याऐवजी माण-खटावच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बैठका घ्याव्यात. माण-खटावच्या मातीत जयकुमारने पाणी आणलय. हा इतिहास कोणी बदलु शकत नाही आणि हा इतिहास या फाकड्यानं निर्माण केलाय. जिहे-कटापूरच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेचे फलक लावणाऱ्यांना जरातरी लाज वाटली पाहिजे. फक्त सरकार असून काही होत नाही, त्यासाठी दम पाहिजे.

सातारा : धोम बलकवडीचं अर्धा टीएमसी पाणी जे मार्डी व परिसरात जाणार होतं ते पाणी फलटणला नेणाऱ्यानं जर खरी मालोजीराजेंची औलाद असाल व 
माण-खटावविषयी थोडस जरी प्रेम असेल तर ते पाणी परत माणला द्यावं. मी मार्डीत नाही तर फलटणला येऊन सत्कार करीन, असे आवाहन माणचे आमदार जयकुमार 
गोरे यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना दिले. 

ढाकणी (ता. माण) येथील तलाव उरमोडीच्या पाण्याने भरल्यानंतर येथील जलपूजन कार्यक्रमात गोरे बोलत होते. यावेळी म्हसवड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते 
अकिल काझी, नगरसेवक संजय सोनवणे, मारुती विरकर, बाळासाहेब माने, विजय धट, ऍड. दत्तात्रय हांगे, काकासाहेब माने, दिगांबर राजगे, उध्दव काटकर, 
बाळासाहेब पिसे, हणमंत काटकर, उत्तम काटकर, तुळशीराम काटकर, रवि काटकर, बबन काळेल, गोरख शिंदे, पिंटु कट्टे, दशरथ काटकर, ढाकणीचे ग्रामस्थ, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ढाकणी ग्रामस्थांनी आमदार जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार केला. 

आमदार गोरे म्हणाले, की रामराजे या व्यक्तिगत नावाला माझा विरोध नाही. पण माण-खटावविषयी त्यांनी जे पाप केलय त्याला माझा विरोध आहे. त्यांनी माणमध्ये निवडणुकांसाठी बैठका घेण्याऐवजी माण-खटावच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बैठका घ्याव्यात. माण-खटावच्या मातीत जयकुमारने पाणी आणलय. हा इतिहास कोणी बदलु शकत नाही आणि हा इतिहास या फाकड्यानं निर्माण केलाय. जिहे-कटापूरच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेचे फलक लावणाऱ्यांना जरातरी लाज वाटली पाहिजे. फक्त सरकार असून काही होत नाही, त्यासाठी दम पाहिजे. ज्या जिहे-कटापूरसाठी वीस वर्षात ऐंशी कोटी आले. त्या योजनेसाठी मी फक्त तीन वर्षात 282 कोटी आणले होते. सध्याचे पालकमंत्री मागील तीन वर्षात फक्त आश्वासनं देत आहेत. मी आणलेल्या 125 कोटीपैकी 82 कोटी खर्च केलेत. उर्वरित रक्कम राहिलेल्या वर्षात तरी खर्च करुन दाखवा, असा टोला पालकमंत्री विजय शिवतारेंना त्यांनी लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com