jaykumar gore and ncp | Sarkarnama

आघाडीत बिघाडी केल्यास राष्ट्रवादी निम्म्यावर आणू : जयकुमार गोरे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 डिसेंबर 2018

बिजवडी (जि. सातारा) : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी निश्‍चित आहे. आजवरच्या निवडणुकीत कॉंग्रेसने आघाडीचा धर्म पाळला आहे. पण राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करते. पण यावेळेस हे खपवून घेतले जाणार नाही. आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न केल्यास जिल्ह्यात चार ते पाच ठिकाणी धक्के देत राष्ट्रवादीला नेहमीपेक्षा निम्म्या जागांवर आणू, असा इशारा माण-खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिला आहे. 

वावरहिरे (ता. माण, जि. सातारा) येथे आगामी निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक बांधणी आणि जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी गणनिहाय मेळाव्यात ते बोलत होते. आमदार गोरे म्हणाले, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी निश्‍चित आहे. विधानसभेपूर्वी लोकसभेची निवडणूक होत आहे. प्रसंगी दोन्हीही निवडणूका एकावेळेस लागल्या तरी नवल वाटायला नको. माढा लोकसभासाठी मतदारसंघ हा राष्ट्रवादीला जात असल्याने कॉंग्रेसकडून आघाडीचा धर्म प्रामणिकपणे पाळत त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, तीच राष्ट्रवादी विधानसभा निवडणूकीत आघाडीचा धर्म न पाळता बंडखोरी करते. 

आजपर्यंत हे खपवून घेत आमच्या जीवावर आम्ही मतदारसंघातील विधानसभा निवडणूक जिंकून दाखवली आहे. येणाऱ्या निवडणूकीतही दाखवू. मात्र, आता हा आमदार फक्त माण मतदारसंघापुरता मर्यादित राहिला नाही. तर तो जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे यावेळेस असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न केला तर जिल्ह्यात चार पाच ठिकाणी धक्के देत राष्ट्रवादीला नेहमीपेक्षा निम्म्या जागांवर आणू. 

आमदार गोरे म्हणाले,या मतदारसंघातील जनतेला आपण एक शब्द दिला होता की साडेतीन वर्षात उरमोडीचे पाणी आणून दाखवणार नाहीतर आमदारकीचा राजीनामा देणार. तो शब्द आपण पूर्ण करून दाखवलाय. तसाच शब्द आज या उत्तर माणच्या जनतेला देत आहे. या भागात जिहे - कटापूरचे पाणी आणून दाखवणारच. अरूण गोरे म्हणाले, मी या गटातला नसतानाही फक्त भाऊंच्या शब्दावर मला तुम्ही निवडून दिले आहे. तो विश्वास नक्कीच सार्थकी लावेन. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख