Jaydutt Kshirsagar appeals people to help administration in fight against corona outbreak | Sarkarnama

संयम बाळगा, काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव म्हणजे हे राष्ट्रीय संकट असून अशा संकटाचा सामना करण्यासाठी जनतेने संयम बाळगावा आणि आणि आपली काळजी घ्यावी असे आवाहनही जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

बीड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव म्हणजे हे राष्ट्रीय संकट असून अशा संकटाचा सामना करण्यासाठी जनतेने संयम बाळगावा आणि आणि आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

क्षीरसागर म्हणाले, की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात आणि राज्यभरात पसरू लागला आहे. या विषाणूवर वर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून योग्य ती पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अशावेळी नागरिकांनी प्रशासनाला आणि प्रशासनाच्या सूचनांना सहकार्य करण्याची गरज आहे.

प्रत्येक नागरिकांनी या विषाणू पासून सावध राहण्यासाठी आपली आणि आपल्या कुटुंबाची ची काळजी घेणे हा सर्वात पहिला उपचार आहे. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरू नका, गर्दी करू नका, स्वच्छता बाळगा, सध्या राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. असे असताना आपण जाणीवपूर्वक गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, कुठल्याही वाहनाने प्रवास करणे हेदेखील धोक्याचे आहे. चार पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रपणे प्रवास करणे योग्य नाही आरोग्य विभागाच्या वतीने ठिकठिकाणी तपासणी मोहीम हाती घेतली गेली आहे त्यांना सहकार्य करा असे आवाहन देखील त्यांनी केले.

कोरोना सारख्या महाभयंकर अशा रोगाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, त्यामुळे सावधानता बाळगा काळजी घ्या आणि संयम ठेवून मुकाबला करा असे असे जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख