स्मृती इराणींबद्दलच्या `त्या' वक्तव्यावर जयदीप कवाडे आजही ठाम

मागे मी केंद्रिय मंत्री स्मृती इराणींबद्दल बोललो होतो. तेव्हा केवढा कहर झाला होता. मुख्यमंत्री, आरएसएस, भाजपवाले सर्वांना ही गोष्ट चांगलीच झोंबली होती. मी आजही आपल्या त्याच बोलण्यावर ठाम असल्याचे जयदीप कवाडे म्हणाले.
स्मृती इराणींबद्दलच्या `त्या' वक्तव्यावर जयदीप कवाडे आजही ठाम

नागपूर: मागे मी केंद्रिय मंत्री स्मृती इराणींबद्दल बोललो होतो. तेव्हा केवढा कहर झाला होता. मुख्यमंत्री, आरएसएस, भाजपवाले सर्वांना ही गोष्ट चांगलीच झोंबली होती. मी आजही आपल्या त्याच बोलण्यावर ठाम असल्याचे जयदीप कवाडे म्हणाले.

नागपूर दक्षिण-पश्‍चिमचे कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार आशिष देशमुख यांनी नुकताच आघाडीच्या पराभूत उमेदवारांच्या सत्काराचा कार्यक्रम घेतला. यामध्ये कवाडे बोलत होते. 

जयदीप कवाडे म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी आम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिला. आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान होण्याचा अधिकार प्रदान केला. संविधान बदलण्याची भाषा बोलली जाते, तेव्हा आमचा एकही नेता बोलत नाही.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बोलले नाहीत. एकमेव जोगेंद्र कवाडे बोलले. जे झालं ते झालं. पुढे अनेक संधी आहे. मी अर्जूनी-मोरगांव मतदार संघातून लढण्याची तयारी केली होती. मात्र मला भंडाऱ्यातून निवडणूक लढवण्याचा आदेश मिळाला आणि तो मी स्वीकारला. कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव हा
भंडऱ्यातूनच झाला होता. पराभवाचा तो डाग मला पुसून काढायचा होता. मात्र जोगेंद्र कवाडेंचा हा भीमसैनिक या निवडणूकीत पराभूत झाला. डॉ. आंबेडकरांचा पराभव आम्ही बदलू शकलो नाही. याला कारण कॉंग्रेसची नेते मंडळी आहे.

ही गोष्ट खरी आहे कॉंग्रेसला कोणीही हरवू शकत नाही. कॉंग्रेसच कॉंग्रेसला आजपर्यंत हरवत आली आहे. भाजप, आरएसएस कॉंग्रेसला नाही हरवू शकत. फक्त कॉंग्रेसमधली गटबाजी थांबली पाहिजे. आम्ही बलिदानाचे कफन बांधूनच बाहेर निघालो आहोत. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचे धाडस आशिष देशमुख यांनी दाखवले. मुख्यमंत्री मोठमोठ्या गोष्टी करत होते. मी एकच दिवस मतदार संघात फिरेन. मला महाराष्ट्रात प्रचार करायचा आहे. मात्र आशिष देशमुख यांनी दिलेल्या आव्हानामुळे ते दक्षिण-पश्‍चिममध्येच फिरताना
दिसले. हा मुख्यमंत्र्यांचा पराभवच होता. गेल्या वर्षांपासून कवाडे साहेब हे कोणताही स्वार्थ न ठेवता कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीत आहेत. आशिष देशमुख यांनी आता संपूर्ण महाराष्ट्रात पर्दाफाश रॅली काढावी, असे आवाहन जयदीप कवाडे यांनी केले. 

यावेळी आशिष देशमुख यांना आता विधान परिषदेवर
निवडून या, अशी शुभेच्छा देताना आम्हाला पण सोबत घ्या, अशी मिश्‍किीली जयदीप कवाडे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com