jaydeep kawade questions prakash ambedkar | Sarkarnama

प्रकाश आंबेडकरांना MIM चालतो, मग RPI चे इतर गट का चालत नाहीत?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकाची गेल्या साडे तीन वर्षात विट देखील हलविली नाही. त्यामुळे भाजपचे दलित प्रेम खोटे आहे.

-जयदिप कवाडे

सातारा : प्रकाश आंबेडकरांना एमआयएम चालतो तर रिपब्लिकन पक्षातील इतर गट का चालत नाहीत. त्यांनी मोठ्या मनाने आपल्यासोबत इतर गटांना घ्यावे, असे  आवाहन पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिप कवाडे यांनी दिले. 

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांचे सुपूत्र व पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिप कवाडे गेल्या काही दिवसांपासून पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ते साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, आम्ही भुमिका बदलली आहे. कोणत्याही रिपब्लिकन नेत्यावर टिका करायची नाही. प्रकाश आंबेडकर हे देशाचे तसेच आमचेही नेते आहेत. आम्हाला त्यांची राजकिय ऍलर्जी नाही. त्यांनी सर्व बहुजन समाजाचे नेतृत्व करावे, आम्ही त्यांच्यासोबत यायला तयार आहोत. त्यांना एमआयएम चालते मग आम्ही का नाही, असा प्रश्‍न उपस्थित करून ते म्हणाले, प्रकाश आंबेडकरांवर टिका करणाऱ्यांना आम्ही खपवून घेणार नाही. त्यांच्यात बाबासाहेब आंबेडकरांचे रक्त आहे. समाजाचे नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. मुळात एमआयएम हे आरएसएससाठी काम करत आहे. एमआयएम आणि बहुजन समाज पक्ष हे इक्वल आहेत. मध्यंतरी काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतली होती, त्यामुळे आता त्यांनी आपली भुमिका स्पष्ट करावी. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख