जयदत्त क्षीरसागरांनी शक्ती प्रदर्शनाने भरला उमेदवारी अर्ज

जयदत्त क्षीरसागर यांचेकुटूंबियांनी औक्षण केले. नंतर त्यांनी जन्मगावी जाऊन नवगण गणपतीचे दर्शन घेतले. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांनाही त्यांनी अभिवादन केले. घोषणांनी बीड दणाणूनगेले होते.
jaydatta anna rally.
jaydatta anna rally.

बीड : राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी गुरुवारी शिवसेनेतर्फे महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. जयदत्त क्षीरसागर  यांनी फेरीपूर्वी देवदर्शन करुन ११ वाजून २६ मिनीटांच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला    

त्यांच्या विजयाच्या घोषणांनी बीड दणाणले होते . त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले.जयदत्त क्षीरसागर यांचे सकाळी पत्नी प्रतिभा क्षीरसागर, बहिण विजया महिंद्रे व चुलत स्नुषा डॉ. सारिका क्षीरसागर यांनी औक्षण केले.

त्यानंतर त्यांनी आपले जन्मगाव राजूरीला जाऊन सहकुटूंब नवगण गणपतीची आरती करुन आशिर्वाद घेतले. त्यांच्या समवेत प्रतिभा क्षीरसागर, विजया महिंद्रे, रोहित क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर होते. 

नंतर शहरातून भव्य फेरी काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. उघड्या जीपमध्ये असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी हाती धनुष्यबाणाची प्रतिकृती घेऊन चाहत्यांना अभिवादन केले. त्यांच्या समवेत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे आदी होते.

यानंतर सभेत त्यांनी विकास कामांचा उहापोह करुन विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला. त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या गेल्या  .  फेरीतील गर्दीमध्ये सहभागींच्या गळ्यातील भगव्या झेंड्यांनी बीड भगवेमय झाले होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com