राष्ट्रवादीचे किल्ले कोसळत आहेत बुरूज ढासळत आहेत: जयदत्त क्षीरसागर 

पेपर आला सिंचनाचा आणि उत्तर द्यावे लागले, शिल्लक कोणी राहते का हे बघण्याची वेळ आल्याचेही जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
Jaydatta-Kshirsagar
Jaydatta-Kshirsagar

बीड : शिवसेनेत आल्यापासून मनस्वी आनंद होत आहे, आपले सर्व कार्यक्रम हाऊसफुल होत आहेत तर तिकडे उलटे चित्र आहे. गळी गळती लागली आहे, किल्ले कोसळत आहेत, बुरूज ढासळत आहेत, शिल्लक कोणी राहिले का हे तपासल्या जात आहे, असा हल्लाबोल शिवसेनेचे बीडचे उमेदवार आणि राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीवर केला.

महायुती होऊ नये म्हणून त्यांनी देव पाण्यात ठेवले होते, अखेर महायुतीचा निर्णय झाला, आता महायुतीचेच सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे. ठाकरे कुटुंबात इतिहास घडत आहेत, आदित्य ठाकरे निवडणुकीत उतरल्याने मोठा उत्साह संचारला आहे, मंत्रालयाचा सहावा मजला त्यांची वाट पाहत आहे असे जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

श्री. क्षीरसागर गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नियोजनासाठी मंगळवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी राष्ट्रवादीवर चौफेर टिका केली. 

शिवसेनेने मला प्रवेश दिला, मंत्रीपद दिले, आता उमेदवारीही दिली. कमी षटकात जास्त धावा करण्याचे काम आपल्याकडे दोन महिन्यात झाले असेही ते म्हणाले.

नियती कोणाला माफ करत नसते, पेपर आला सिंचनाचा अन् उत्तर द्यावे लागले बँकेचे, उथळ पाण्याला खळखळाट जास्त असतो, अनैतिकतेने वागलात त्याची परतफेड करावीच लागेल, अजूनही पक्ष प्रवेश थांबायला तयार नाहीत, शिल्लक कोणी राहते का हे बघण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com