शिवसेना-भाजपा फेव्हीकॉल का जोड है...टुटेगा नही : जयदत्त क्षीरसागरांना विश्वास  

पालकमंत्र्यांनी विकासासाठी मोठा निधी मिळवला आहे. शिवसैनिकानीही पक्षबांधणीसाठी कामाला लागावे. पक्ष मजबूत असला की नेतृत्वाला उभारी येते असे जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
शिवसेना-भाजपा फेव्हीकॉल का जोड है...टुटेगा नही : जयदत्त क्षीरसागरांना विश्वास  

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभापूर्वी आणि नंतरही भाजप - सेना युतीची घोषणा केली असली तरी इतर नेत्यांकडून हळूच स्वबळाचे फटाके फोडले जात आहेत. त्यातच दोन्ही बाजूंनी स्वतंत्र लढण्याची तयारीही सुरुच असते. मात्र, याच वेळी रोहयो आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मात्र युती होणार, असा पक्का विश्वास आहे. 

शिवसेना पक्षबांधणीसाठी आता प्रत्येकाने कामाला लागावे. पक्ष मजबूत असला की नेतृत्वाला उभारी येते. युतीची काळजी करू नका असे सांगून ‘शिवसेना - भाजपा फेव्हीकॉल का जोड है, टुटेगा नही...’ असा विश्वासही क्षीरसागर यांनी व्यक्त केला.  बीड तालुक्यातील पाली येथील शिवसैनिकांच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

मंत्रीपदाच्या माध्यमातून जयदत्त क्षीरसागर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. पंचायत समिती गणनिहाय बैठका आणि शिवसैनिकांचे मेळावे ते घेत आहेत. ग्रामीण भागात रोहयोतील कामे कार्यकर्त्यांसाठी मोठी संधी मानली जाते. त्यातच त्यांनी पाणंद रस्ता कामांच्या अटी शिथील केल्या आहेत. आपल्या खात्यांतर्गत असणारे सर्व प्रलंबित प्रकरणे मंजूर केले आहेत. गावात तातडीने पाणंद रस्ते होण्यासाठी  मागण्या करा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माऊली महाराज मंझरीकर, कूंडलिक खांडे, सचिन मुळूक, बाळासाहेब आंबुरे, संगिता चव्हाण, प्रा.जगदीश काळे, दिलीप गोरे, अरूण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, गणपत डोईफोडे, अरुण बोंगाने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com