जयदत्त क्षीरसागरांसाठी बहिण, वहिनी आणि सूनदेखील प्रचारात अग्रेसर...

 जयदत्त क्षीरसागरांसाठी बहिण, वहिनी आणि सूनदेखील प्रचारात अग्रेसर...

बीड : निवडणुकीत विजयाचे गणित जुळविण्यासाठी करावे लागणारे प्लॅनिंग आणि डावपेचात क्षीरसागर घराणे माहिर आहेच. परंतु, विविध घटकांशी थेट संपर्क करण्यासाठीची तगडी यंत्रणाही त्यांच्याकडे असते. आता या सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून निवडणुकीत सर्वात प्रभावी घटक समजल्या जाणाऱ्या महिला वर्गासाठी त्यांच्या बहिण विजया महिंद्रे, वहिनी प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर व भावाची सून डॉ. सारिका क्षीरसागर प्रचारात उतरल्या आहेत. 

बीड जिल्ह्याच्या राजकारणाचे निकाल भलेही आतापर्यंत सामाजिक रचना आणि जातीच्या गणितावर लागले. परंतु, अत्यल्प समाजातून असूनही या प्रचलीत समीकरणाला दिवंगत केशरबाई क्षीरसागर व रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी छेद देत विजयाचे गणित जुळविले. परंतु, त्यासाठी मायक्रो प्लॅनिंग आणि समाजाच्या विविध घटकांशी असलेला त्यांचा संपर्क आणि तगडी यंत्रणा हेच त्यांच्या विजयाचे इंगित ठरलेले आहे. 

दरम्यान, निवडणुकीत महिला हा सर्वात प्रभावी घटक मानला जातो. अगदी या घटकामुळेच निवडणुकीचे निकालही बदलल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या घटकाशी जवळीक साधून त्यांचे प्रश्न जाणून घेत त्यावर उपाय शोधून त्यांना घट्ट बांधणारी यंत्रणा कायम जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत आहे. बीडच्या नगराध्यक्षा राहिलेल्या त्यांच्या वहिनी डॉ. दीपा क्षीरसागर यांची शिक्षण, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात कायम वावर असतो. विशेष म्हणजे त्यांच्या पुढाकाराने शहरात वृद्धांसाठीचेही उपक्रम नित्याने होत असल्याने हा घटकही जोडून ठेवण्यात त्यांनी यश मिळविलेले आहे. 

त्यांच्या सून डॉ. सारिका क्षीरसागर पेशाने डॉक्‍टर असल्या तरी मागच्या वर्षभरापासूनच त्या बचत गटांच्या माध्यमातून समाजकारणात सक्रीय झाल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेण्याबरोबच त्यांनी या घटकाशी चांगला संवाद आणि संपर्क वाढविला आहे. आता शेवटच्या टप्प्यात त्यांच्या बहिण विजया महिंद्रेही आता प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्या आहेत. एकिकडे पक्षाची महिला आघाडी जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी प्रचार करत आहेच. परंतु, आता ही घरातील मंडळीही प्रचारात उतरल्याने महिला वर्गाच्या समस्या, त्यांची मते थेट क्षीरसागरांपर्यंत पोचत आहेत. त्यामुळे काही अडचणी असल्या तरी त्यावरील तोडगाही वेळेत निघू शकतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com