पक्षप्रवेशाची आपण पायवाट केली आता राष्ट्रीय महामार्ग झाला : जयदत्त क्षीरसागर

पक्षप्रवेशाची आपण पायवाट केली आता राष्ट्रीय महामार्ग झाला : जयदत्त क्षीरसागर

बीड : शिवसेना किती कट्टर आणि कर्मठ आहे हे माझ्याएवढे दुसरे कोणी ओळखत नसेल. माझ्यावर बेतलेले असे अनेक प्रसंग मला आठवतात. अमिषाला, भूलथापांना बळी न पडता मताच्या पेटीला राखण बसणारा शिवसैनिक मी पाहिला आहे. शिवसेना म्हणजे शिवसेनेच्या निष्ठेची आणि कष्टाची ताकत आहे असे असे मत व्यक्त करत शिवसैनिकांमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी चांगलेच स्फुरण चढविले. 

जातीपातीच्या पलिकडे जाऊन विकासाची विचारधारा फक्त शिवसेनेमध्ये पाहाण्यास मिळते. पक्षप्रवेशाची आपण पायवाट पडली तो आता राष्ट्रीय महामार्ग झाला असा टोला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला लगावला. शिवस्वराज्य यात्रा काढून शोधयात्रा राबवत असल्याची खिल्लीही त्यांनी उडविली. बीड जिल्ह्यात शिवसेनाच उदय हा मुळात क्षीरसागर यांच्या विरोधातून झाला आहे. आतापर्यंत ज्यांच्याशी दोन हात केले आता त्यांचे झेंडे शिवसैनिकांना हातात घ्यावे लागणार आहेत. 

आगामी निवडणुकीत शिवसैनिकांना चुचकारण्यासाठी क्षीरसागरांनी शिवसेना आणि शिवसैनिकांची मेळाव्यात स्तुती केली. शिवसेनेसारख्या पक्षात काम करण्याची संधी नशिबाने मिळते. शिवसैनिक कसा कडवट असतो, चिवट असतो याचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. वाट्टेल ते होईल पण कोणत्याही अमिषाला, भुलथापांना बळी न पडता, पक्षाने दिलेले काम, सोपवलेली जबाबदारी कायम पार पाडणारा शिवसैनिक मी पाहिले आहेत. जातीपातीच्या पलिकडे जाऊन विकासाची विचारधारा फक्त शिवसेनेमध्येच आहे असेही क्षीरसागर यांनी आवर्जून सांगितले. 

जुन्या - नव्यांचे मन जुळवण्याची प्रक्रिया आम्ही आता गतिमान केली आहे. पक्ष वाढला पाहिजे हिच माझी भूमिका आहे. मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश देताच मला मंत्रिपद दिले हे ही फक्त शिवसेनेमध्येच होऊ शकते. पक्षप्रवेशाची पायवाट मी तयार केली. आता राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. विरोधी पक्ष शिवस्वराज्य यात्रा काढून पक्षाची शोधयात्रा राबवत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com