सावरगावच्या दसरा मेळाव्याला उपस्थित रहा : जयदत्त क्षीरसागर

सावरगावच्या दसरा मेळाव्याला उपस्थित रहा : जयदत्त क्षीरसागर

बीड : संत भगवान बाबांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे होत असलेल्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे रोहयो मंत्री आणि शिवसेना महायुतीचे बीडचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. सावरगाव येथील भगवान भक्तीगड येथे भगवान बाबांच्या जन्मभूमीत मंगळवारी होत असलेला हा दसरा मेळावा वेगळा आहे. 


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे तसेच राज्यातील मंत्री, खासदार, आमदार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सर्व जाती धर्मातील महापुरूषांच्या प्रतिमा असलेले झेंडे संत भगवान बाबा यांचे स्मारक असलेल्या 25 फूट मुर्तीच्या परिसरात लावण्याचा संकल्प करण्यात आला असून दसरा मेळाव्यासाठी सावरगाव येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून अलोट जनसागर उसळणार आहे असेही जयदत्त क्षीरसागर म्हणाले. या दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे बीड मतदार संघातील उमेदवार आणि राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com