तुम्ही आशीर्वाद द्या, विकासाची जबाबदारी माझी : जयदत्त क्षीरसागर

तुम्ही आशीर्वाद द्या, विकासाची जबाबदारी माझी : जयदत्त क्षीरसागर

बीड : दुर्गेची अनेक रुपं आपण नवरात्रात पुजतो, दुर्गेला आशीर्वाद मागतो. त्या आशीर्वादावर आपल्याला वर्षभर उर्जा मिळते. तसाच आशीर्वाद तुम्हाला मागत आहे. मला आशीर्वाद द्या, विकास करण्याची जबाबदारी माझी असे आश्वासन शिवसेना, भाजपा, रासप मित्रपक्षाचे बीड मतदार संघातील उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. 

जयदत्त क्षीरसागर सध्या शहराती विविध घटकांच्या बैठका, नवरात्रोत्सवा निमित्त देवींच्या आरतीच्या निमित्ताने मतदारांच्या भेटी घेऊन संवाद साधून आवाहन करत आहेत. धांडेनगर, छत्रपती शिवाजी राजे नगर, छत्रपती संभाजीराजे नगर, राजे शहाजी पार्क आदी ठिकाणी देवीच्या आरतीनंतर धांडे निवासस्थानी आयोजित कॉर्नर बैठकीत बोलत होते. त्यांच्या समवेत अरुण डाके, गणपत डोईफोडे, झुंजार धांडे उपस्थित होते. 

श्री. क्षीरसागर म्हणाले, मी आश्‍वासन देवून जाणार नाही तर आश्‍वासनाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहील. त्यामुळे तुमचा रस्त्याचा, पाण्याचा प्रश्‍न, नाल्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याची जबाबदारी माझी राहील असे आश्वासनही त्यांनी दिले. देशात आणि राज्यात विकास झपाट्याने होत आहे, त्या विकास प्रक्रियेत आपला बीड जिल्हा मागे राहू नये याची जबाबदारी माझी राहील असेही ते म्हणाले. 

प्रास्ताविक शिवाजी जगताप यांनी केले. अमोल शिंदे, पांडूरंग बारवडकर, गोरख हाडूळे, युवराज घोडके, गोरख गायकवाड, काकासाहेब वरवडे, अनिल चव्हाण, अंकुश शिंदे, लक्ष्मण कोलंगडै, परमेश्‍वर सावंत, शिवाजी गवळी, गोरख पैठणे, दूर्गादास हुंबे, हरिश शिंदे, रोहन जाधवर, गणेश चव्हाण, बाळू शिंदे, अनिकेत ढोले, पवन चव्हाण, रवि शिंदे उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com