जयवंतराव जगताप भाजपमध्ये जाणार; पण रश्मी बागलांना विरोध करणार

जयवंतराव जगताप भाजपमध्ये जाणार; पण रश्मी बागलांना विरोध करणार

करमाळा : करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.सध्या ते काॅग्रेसमध्ये आहेत. भाजपात प्रवेश केल्यानंतर येत्या विधानसभा निवडणुकीत आपण भाजपबरोबरच रहणार असल्याचे ही त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

जयवंतराव जगताप हे दोन वेळा आमदार होते.तर 29 वर्षं बाजार समितीचे सभापती होते. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडीच्या वेळी बागल -जगताप असा टोकाचा संघर्ष पहायाला मिळाला. यावेळी मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल व प्रा.शिवाजी बंडगर यांना मारहाण झाली. या प्रकरणात जयवंतराव जगताप हे संशयित आरोपी आहेत. या प्रकरणात त्यांना 9 महिन्यांनी जामीन मिळाला. गेल्या 10 महीन्या नंतर पहील्यांदाच त्यांनी बागल यांच्याविषयी उघड भूमिका मांडली आहे.

 
यावरून काही महीन्यापासुन राजकारणापासून अलिप्त असलेले जगताप आता विधानसभेच्या तोंडावर राजकारणात सक्रीय होऊ लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जगताप यांचे चिरंजीव शंभुराजे जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता जयवंतराव जगताप हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत चार दिवसापुर्वी त्यांनी कराड येथे चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. 

भाजप-शिवसेना युती झाली तर आपण युतीच्या उमेदवाराचा प्रचार करू, माञ जर करमाळ्यात शिवसेनेने रश्मी बागल यांना उमेदवारी दिली तर आपण बागल विरोधात काम करणार असल्याचेही जगताप यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

रश्मी बागल यांनी स्वतःच्या व त्यांच्या वडिलांच्या राजकीय इतिहासाचे अवलोकन करावे. बागल गटाचा प्रवास शेकाप, जगताप गट, मोहिते -पाटील गट , भाजप -सेना पुरस्कृत , राष्ट्रवादी, काँग्रेस पुन्हा राष्ट्रवादी असा झाला आहे. प्रत्येक वेळी बागलांनी सोयीचे राजकारण केले असल्याचे सांगितले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com