सावकारी कायद्यात बदल, सुधारणांसाठी समिती स्थापन करणार - जयंत पाटील

सावकारी कायद्यात बदल, सुधारणांसाठी समिती स्थापन करणार - जयंत पाटील

नागपूर : सावकारी कायद्याचा अपेक्षित वचक नसल्याने त्याचा धाक वैध, अवैध सावकारांमध्ये नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शोषणाचे प्रकार घडतात. त्याची दखल घेत सावकारी कायद्यात बदल आणि सुधारणांच्या शिफारशीसाठी विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा सहकार मंत्री जयंत पाटील यांनी केली. 
शुक्रवारी (ता.) नियम अन्वये अल्पकालीन चर्चेत यवतमाळ जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध सावकारी आणि त्याला सहकार खात्याच्या अधिकारी अर्चना माळवे यांच्याकडून मिळणारे प्रोत्साहन याविषयीचा मुद्दा विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला.त्याला उत्तर देताना सावकारी कायद्यात सुधारणांसाठी समिती स्थापण्याची घोषणा श्री. पाटील यांनी केली.

यवतमाळच्या महागाव येथील एका सावकाराने तब्बल एकर जमीन हडप केली आहे. त्याच्यावर कारवाई होत नाही. उलटत तोच लोकप्रतिनिधींना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्‍या देतो, असे विद्या चव्हाण यांनी सांगितले. जयंत पाटील म्हणाले, की सावकारी प्रकरणात शेतकरीविरोधी काम करणाऱ्यांवर निश्‍चित कारवाई केली जाईल. राज्यातील वैध आणि अवैध सावकारांना देखील याद्वारे जरब बसविण्याचा प्रयत्न होईल. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष्य दिले असते तर राज्यात अवैध सावकारी फोफावलीच नसती.

आम्ही मात्र येत्या तीन महिन्यात जरब बसविणारा कायदा अस्तित्वात आणू. अर्चना माळवे यांची चौकशी करण्याचे सहकार सचिवांना सुचीत केले जाईल आणि कसूरी आढळल्यास निश्‍चित कारवाई करू, अशी घोषणाही जयंत पाटील यांनी केली. राज्यातील शोषण झालेल्या शेतकरी वर्गाला ही समिती न्याय देईल, असा माझा विश्‍वास आहे. या समितीत सुरेश धस, गिरीश व्यास आणि ख्वॉजा बेग यांचा समावेश असेल. त्यांच्या अहवालाद्वारे सुचविलेल्या सुधारणांची अंमलबजावणी सहकार, महसूल खाते करेल, असे श्री. पाटील म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com