मणेर कुटुंबियांसाठी मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला फोन केलेला नाही: जयंत पाटील

जयंत पाटील यांनी फोन केल्यामुळेच परिस्थिती चिघळली असल्याचा आरोप केला जात आहे.
jayant patil warns local opponents who spreading wrong information
jayant patil warns local opponents who spreading wrong information

सांगली: इस्लापूरातील कोरोनाबाधित मणेर कुटुंबीय इस्लामपूरात कधी दाखल झालं, याची मला कल्पनाही नाही. त्यांची टेस्ट ज्यावेळी पॉझिटीव्ह निघाली, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी इस्लामपूरात ४ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे मला कळवले. या प्रकरणात काही स्थानिक राजकारण्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. 

'व्होक लिबरल' या ट्विटर हँडलवरून कालपासून जयंत पाटील यांच्याविरोधात चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यावर जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर खालच्या पातळीचे राजकारण करू नका, असा इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी फेसबुकद्वारे दिला आहे. मणेर कुटुंबियांसाठी मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला नाही. कोरोनाबाधित सर्व रुग्णांवर मिरजेत उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वॉरनटाईन केले गेले आहे. प्रशासनाला कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. कुणालाही कोणतीही मुभा दिली गेलेली नाही. आम्ही सुरुवातीपासूनच लॉकडाऊनच्या समर्थनार्थ आहोत. राज्यात सर्वात आधी प्राथमिक शाळा व अंगणवाड्या सांगली जिल्ह्यात बंद केल्या गेल्या. आजही आम्ही काळजी घेत आहोत. खालच्या पातळीचे राजकारण करू नये. समाजात चुकीची माहिती पसरवून संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरोधात मी तक्रार दाखल करणार आहे.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com