जयंत पाटील इंदापुरातील काॅंग्रेस भवनात; पण हर्षवर्धन पाटील परगावी

jayant patil visits congress office in indapur
jayant patil visits congress office in indapur

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (ता. 27 ऑगस्ट) इंदापूर येथील काँग्रेस येथी भवनला अचानक भेट दिली.

या वेळी पक्षाचे प्रमुख नेते हर्षवर्धन पाटील किंवा स्थानिक काॅंग्रेस नेते उपस्थित नव्हते. मात्र दोन्ही काॅंग्रेसमध्ये इंदापूर तालुक्यात ताणाचे वातावरण असताना जयंत पाटील यांनी काॅंग्रेस कार्यालयाला भेट देऊन तो ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. हर्षवर्धन पाटील हे परगावी असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना सरकारची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा करमाळा ( जि. सोलापूर ) येथून इंदापूर येथे आली.

नगरपरिषद प्रांगणात या यात्रेचे स्वागत झाले. नगरपरिषद प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन यात्रेस सुरुवात झाली. त्यानंतर बसस्थानक मार्गे ही यात्रा सुरू असताना रस्त्यातच काँग्रेस भवन लागले. काँग्रेस भवन पाहून जयंत पाटील तेथे भेट दिली. 

हर्षवर्धन पाटील यांचे मदतनीस देवराज देशमुख, सुहास शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून यात्रेचा समारोप कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी झालेल्या विराट जाहीर सभेत किसनराव खाडे तसेच इतर कार्यकर्त्यांनी चांगले काम करणाऱ्या आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीच्या घोषणेची मागणी केली. यावेळी जयंतराव पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा सुरु असून याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. आमदार भरणे यांचे काम चांगले असून कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असे आवाहन त्यांनी केले.

त्यातच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे हे नेते न आल्याने कार्यकर्ते नाराज झाले. राज्यात तुमची आघाडी झाली तरी तालुक्यात आमदार भरणे यांना न्याय मिळावा, अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत रंगली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com