आमदारांचा विरोध डावलून राष्ट्रवादीने उदयनराजेंना निवडून आणले!

राजे तुम्ही सुध्दा असे म्हणून उदयनराजे यांच्या प्रवेशावर नाराजी व्यक्त केली.
आमदारांचा विरोध डावलून राष्ट्रवादीने उदयनराजेंना निवडून आणले!

इस्लामपूर (सांगली) :  ज्या उदयनराजेंना सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बहुतांशी आमदारांचा विरोध डावलून राष्ट्रवादीतून खासदार केले. त्या उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावर जयंत पाटील यांनी  ‘राजे तुम्ही सुध्दा?’ एवढे बोलून पक्ष बदलाच्या मानसिकतेवर त्यांनी खेद व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीनंतर खासदार उदयनराजे यांनी भाजपच्या निवडणुक पध्दतीवर नाराजी व्यक्त करत इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करुन भाजप सरकार सत्तेवर आले आहे. यापुढच्या सर्व निवडणूका मशीन ऐवजी मतपत्रीकेवर व्हाव्यात, अशी मागणी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर राज्यात भाजप-शिवसेनेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीमधून अनेकांनी पक्षांतर केले आहे. सातार्‍याचे खासदार उदयनराजे यांनीही दिल्लीमध्ये जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यावर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना राजे तुम्ही सुध्दा असे म्हणून उदयनराजे यांच्या प्रवेशावर नाराजी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com