जयंत पाटील सांगलीतील पाच बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणार

jayant patil sangli
jayant patil sangli

सांगली : जिल्ह्याच्या प्रशासनातील प्रमुख पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या चार दिवसांत होणार आहेत. तसे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. प्रशासनातून मात्र याला दुजोरा मिळत नाही. राज्यात भाजपची सत्ता गेल्यानंतर राज्यभरातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि कामचुकार अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जात आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सांगली जिल्ह्याच्या प्रशासनातील प्रमुख पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार हे स्पष्ट झाले आहे. एप्रिल, मे मध्ये त्याची अंमलबजावणी होईल याची चर्चा होती. ती चार दिवसांतच होईल असे संकेत आहेत. जिल्ह्यात महापूर काळात प्रशासकीय कामकाज, ब्रम्हनाळ येथे महापूरात 17 जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर अर्धा डझन अधिकारी भोवऱ्यात अडकले होते. निर्धारित कालावधी संपलेल्यांसह महापूरावेळच्या हलगर्जीपणा केलेल्यांत दोषी अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी आढावा बैठक घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथील दुर्घटना आणि महापुराच्या काळात प्रशासनातील अधिकाऱ्यांबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर त्यांनी अद्याप चौकशी सुरु आहे, असे सांगून याबाबत सरकारचे इरादे स्पष्ट केले. जिल्ह्यात सुरु अवैध व्यवसाय, महापूर काळात चुकांची परिसीमा गाठणारे अधिकारी, याच काळात तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सांगलीच्या कारभारासाठी सोयीसाठी आणलेले अधिकारी, कालावधी संपलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा यात समावेश असेल. बदल्यांच्या शक्‍यतेने अधिकाऱ्यांत मोठी चलबिचल सुरु झाली आहे. त्यातील काही अधिकाऱ्यांनी रजा टाकून मुंबई, दिल्लीच्या वाऱ्या सुरु केल्या आहेत. काही अधिकारी बैठकांच्या निमित्ताने पुणे, मुंबईत तळ ठोकून आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आले आहे. सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री नेमल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. त्यात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदलीचीही चर्चा होती. त्याला आता गती आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com