गिरीश महाजन, आशिष शेलारांकडे पहात जयंत पाटील म्हणाले....फडणवीस साहेब यांना जरा दुसरीकडे बसवा!

दिंडोरीचे आमदार नरहरी झीरवाळ विधानसभेचे उपसभापती झाले. यावेळी स्वागत प्रस्तावात जयंत पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना चांगलेच चिमटे काढले
गिरीश महाजन, आशिष शेलारांकडे पहात जयंत पाटील म्हणाले....फडणवीस साहेब यांना जरा दुसरीकडे बसवा!

नाशिक : दिंडोरीचे आमदार नरहरी झीरवाळ विधानसभेचे उपसभापती झाले. यावेळी स्वागत प्रस्तावात जयंत पाटील यांनी खुसखुशीत भाषण केले. यावेळी माजी झीरवाळ यांच्या मागे गिरीश महाजन, आशिष शेलार बसले होते. हा संदर्भ घेत संगतीचा परिणाम होतो, त्यामुळे फडणवीस साहेब या दोघांना जरा दुसरीकडे बसवा असा चिमटा जयंता पाटील काढला. तेव्हा शेलार अन् महाजन दोघेही खळखळून हसले.

यावेळी जयंत पाटलांनी अनेक प्रसंग, आठवणींना उजाळा दिला. ''झीरवाळ हे आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. या समाजाला आज विशेष आनंद झाला आहे. ते पारंपारीक वेषात त्यांच्या स्वागताला जमले आहेत. झीरवाळ यांनीही त्यात सहभागी होण्याची परवानगी मागितली आहे, आपण सर्वांनी त्यात सहभागी होऊ या.'' असे पाटील म्हणाले. 

पाटील यांनी आपल्या भाषणात भाजपच्या नेत्यांना चिमटे काढले, आज ते समोरच्या बाकावर बसले आहेत. शेजारी (देवेंद्र फडणवीस) अतिशय सभ्य, सुसंस्कृत व्यक्ती आहे, असे सांगत मागच्या बाकावर गिरीश महाजन व आशिष शेलार बसले होते याचा संदर्भ घेत 'वार नेहमी मागून होतो' असे म्हणत फडणवीस साहेब या दोघांना जरा दुसरीकडे बसवा, असे म्हटल्यावर सभागृहात सदस्य हास्यात बुडाले. या खळखळाटात सहभागी होत आशिष शेलार यांनी गिरीश महाजनांकडे सुचक इशारा केला.

राज्यात फडणवीस यांनी शपथ घेतल्यावर झालेल्या घडामोडींत झीरवाळ यांना दिल्लीत ठेवले होते. यावेळी त्यांनी मला दोन तीन वेळा फोन केला, असे सांगत जयंत पाटील म्हणाले ''यावेळी होटेल फार मोठे आहे. कुठे काय आहे हे कळतच नाही. कुठेही गेले की बाॅडीगार्ड मागेच असतात. गोंधळ होतो आहे. असे झीरवाळ सांगत होते.'' हे सांगताना जयंत पाटील यांनाही हसू आवरत नव्हते. सभागृहातून हे बाॅडीगार्ड कोणाचे, अशी विचारणा झाल्यावर ''ते मुनगंटीवारांचे होते असे मी म्हणणार नाही'' असा आणखी एक चिमटा पाटील यांनी काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com