शरद पवारांविषयी जनतेत सहानुभूतीची लाट: जयंत पाटील  

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंविरोधात सक्षम उमेदवार देणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.
शरद पवारांविषयी जनतेत सहानुभूतीची लाट: जयंत पाटील  

सातारा : सध्या शरद पवार हे सरकारच्या चुकांवर बोट ठेवू लागल्याने जनतेतून सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. त्यातून राष्ट्रावादीला ताकद देण्याची भुमिका निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाराष्ट्रातील चित्र बदललेले दिसेल आणि पक्ष सोडून गेलेल्यांना पश्‍चाताप होईल, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

श्रीवर्धन येथे शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी जाताना उशीर झाल्याने जयंत पाटील आज सायंकाळी साताऱ्यातील शासकिय विश्रामगृहात थांबले. यावेळी त्यांनी सातारा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाबाबत जिल्हाध्यक्ष सुनील माने व पदाधिकाऱ्यांशी कमराबंद चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, साताऱ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे अनेक सक्षम कार्यकर्ते आहेत. पण सर्वांशी विचार विनिमय करून सक्षम उमेदवार दिला जाईल. श्रीनिवास पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी कोणाचे नाव पुढे येईल, यावर अधिक बोलणे टाळत आम्ही योग्य उमेदवार देऊ, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com