आज आई नाही, याची खंत आहे. ती असती तर तिला खूप आनंद झाला असता : जयंत पाटील 

आज आई नाही, याची खंत आहे. ती असती तर तिला खूप आनंद झाला असता : जयंत पाटील 

मुंबई :"" माझ्या यापूर्वीच्या प्रत्येक शपथेनंतर आशीर्वाद द्यायला आई असायची. आज आई नाही, याची खंत आहे. ती असती तर तिला खूप आनंद झाला असता. आई जिथे कुठे असेल तिथून मला पाहून नक्कीच आशीर्वाद देत असेल अशी भावनिक पोस्ट राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. 

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असेल. शेतकरी, युवा व महिला वर्गाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही योजनांची आखणी व अंमलबजावणी करू.निर्णय घेताना जनता व सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ असेही ते म्हणाले. 

केवळ आताच्याच नाही तर येणाऱ्या पिढयांना देखील आनंदाने या राज्यात जगता येईल, असे राज्य उभे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. समृद्ध महाराष्ट्राच्या सोबतच सुखी आणि आनंदी महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करू. माझे नेते शरद पवार साहेब आणि माझे सर्व सहकारी यांचे मी विशेष आभार मानतो. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांच्या लाखो कार्यकर्त्यांचे मी विशेष अभिनंदन करतो. हा विजय या तिन्ही पक्षातील लाखो कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि मी तो त्यांनाच समर्पित करू इच्छितो. गाच्या नकाशावर हा महाराष्ट्र नेण्यासाठी आम्ही सर्व सहकारी रक्ताचे पाणी करून अथक मेहनत घेऊ, इतकाच शब्द मी आज आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेला देतो असेही त्यांनी म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com