वारजे माळवाडी : राज्यात उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळा विस्ताराच्या दोन दिवस अगोदर राज्याचे अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना शनिवारी 'चाणक्यनीती' आणि 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' वाचण्याचा मोह आवरला नाही.
त्याचे झाले असे की, कोथरूड येथील साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित साहित्यिक कलावंत संमेलनात ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पुस्तके पाहताना त्यांना 'चाणक्यनीती' पुस्तके दिसले. त्यांनी ते लगेचच हातात घेतले आणि आवर्जून त्यांनी काही पाने चाळली.
तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत काम करताना जयंत पाटलांना चाणक्य नीती मधील काही उपदेश कामाला येणार का या विषयी उपस्थितीत चर्चा रंगली .
त्यानंतर 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तकही त्यांनी हातात घेऊन चाळले. त्यामुळे, सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळा विस्ताराच्या आधी एवढा वेळ दिल्याने नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.